Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंडरटेकरच्या निवृत्तीनंतर मुंबई इंडिन्सचे टि्वट व्हायरल

Webdunia
बुधवार, 24 जून 2020 (21:32 IST)
गेली  तीन वर्षे डब्ल्यूडब्ल्यूइमध्ये अंडरटेकरने आपल्या चाहत्यांवर जादू केली होती. त्याची एक झलक पाहण्यासाठी  चाहते उत्सुक असायचे. तीस वर्षांनंतर आता त्याने निवृत्ती घेतल्यानंतर मुंबई इंडियन्सने एक टि्वट केले असून ते चांगलेच व्हायरल झाले आहे.
 
मुंबई इंडियन्सने त्याला सलाम ठोकत हे टि्वट केले आहे. या टि्वटमध्ये रोहित शर्मा दाखवण्यात आला आहे आणि त्याच्याकडे अंडरटेकरसारखा बेल्ट असल्याचे पाहायला मिळत आहे. हा बेल्ट रोहितने दोन्ही हाताने उंचावलेला पाहायला मिळत आहे. 
 
एक काळ असा होता की, अंडरटेकर या नावाचे प्रचंड वलय होते. डब्ल्यूडब्ल्यूइ ही कुस्ती सुरु झाली की, सर्वांनाच अंडरटेकरला पाहण्याची इच्छा व्हायची. गेली तीस वर्षे त्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केले. तो जेव्हा रिंगमध्ये जाण्यासाठी तयार  व्हायचा, तेव्हा सर्व लाईट्‌स बंद करण्यात यायच्या.सुरुवातीला त्याच्याबरोबर एक कलश घेऊन व्यक्ती यायची. या डेडमॅनच्या अस्थी या कलशामध्ये आहेत, अशी त्यावेळी अफवाही पसरली होती. डब्ल्यूडब्ल्यूइमधील अंडरटेकरची एंट्री ही भन्नाट असायची. सर्व लाइट्‌स बंद असताना तो यायचा. काळे कपडे त्याने परिधान केलेले असायचे, त्याचबरोबर काळी हॅटही तो वापरायचा. त्याची एंट्री एवढी भीतीदाक होती की, त्यावेळी बरीच लहान मुले घाबरायची. त्याचे डोळे पाहण्यासाठीही बरेच चाहते उत्सुक असायचे. 
 
 
केन हा तोंडाला एक वेगळेच  मास्क लावून यायचा. केन आणि अंडरटेकर यांच्यातील लढत चांगलीच रंगायची. कारण या लढतीमध्ये बरीच नाट्यही पाहायला मिळायची. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

ठाणे : वेश्याव्यवसायात अडकल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल, तरुणीची सुटका

नौदलाच्या पाणबुडीला मासेमारीची बोटची धडक दोघांचे मृतदेह बाहेर काढले

LIVE: महाराष्ट्रातील वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मागे घेतला

पुढील लेख
Show comments