Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद नोवाक जोकोविचने राखले

Webdunia
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020 (14:02 IST)
सर्बियाचा विख्यात टेनिसपटू नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलिन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत त्याने ऑस्ट्रिलायाच्या डॉमिनिक थिएमर 6-4, 4-6, 2-6, 6-3, 6-4 अशा पाच सेट्‌समध्ये विजय मिळवला. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे जोकोविचचे हे आठवे विजेतेपद ठरले आहे. त्याचबरोबर गतविजेत जोकोविचने आपले जेतेपद स्वतःकडेच कायम राखले आहे.
 
जोकोविचने तीन तास व 59‍ मिनिटे चाललेल्या या सामन्यात विजय मिळवला. 32 वर्षीय जोकोविचचे हे 17 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले. रॉजर फेडररच्या 20 ग्रँडस्लॅम विजेतेपदांशी बरोबरी करण्यासाठी त्याला केवळ 3 विजेतेपदांची गरज आहे. थिएमचा ग्रँडस्लॅमधला हा तिसरा अंतिम सामना होता व तिसर्‍यातही त्याल पराभवाचा सामना करावा लागला. तो यापूर्वी 2018 व 2019 मध्ये फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला होता व दोन्ही वेळेला त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. तर जोकोविचने यापूर्वी 2008,2011, 2012, 2013, 2015, 2016, 2019 मध्ये हा किताब जिंकला आहे.
 
अंतिम सामन्यात पहिला सेट जोकोविचने आपल्या नावाला साजेल अशा पध्दतीने खिशात घातला. त्यानंतर दुसर्‍या सेटमध्ये थिएमने केलेला खेळ हा कौतुकास्पद होता. जोकोविचवर पूर्णपणे सरशी मिळवत थिएमने सलग दोन सेट जिंकत सामन्यात आघाडी घेतली. चौथ्या सेटमध्ये जोकोविचने दमदार पुनरागन करत सामन्यात बरोबरी साधली. अखेरच्या सेटमध्येही दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलीच झुंज रंगली होती. थिएमने आपल्या ठेवणीतल काही खास फटक्यांच्या जोरावर जोकोविचला चांगलेच सताविले. मात्र, सरतेशेवटी जोकोविचने आपला सर्व अनुभव पणाला लावत विजेतेपदावर आपली मोहर उमटवली.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments