Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विश्वचषक नेमबाजीत भारताला कांस्य

Webdunia
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017 (08:56 IST)
पूजा घाटकरने येथील डॉ. कर्णिसिंग शुटिंग रेंजमध्ये शुक्रवारी सुरू झालेल्या  विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताला दहा मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदक जिंकून दिले. माजी आशियाई चॅम्पियन असलेल्या २८ वर्षांच्या पूजाने २२८.८ गुणांसह कांस्य जिंकले. चीनच्या मेंगयावो शी हिने २५२.१ गुणांसह सुवर्ण जिंकून नवा विश्वविक्रम नोंदविला. तिची सहकारी डोंलिजी हिने २४८.९ गुणांसह रौप्यपदक पटकविले. मागच्यावर्षी रिओ आॅलिम्पिकचा कोटा मिळविण्यात थोड्या फरकाने वंचित राहिलेल्या पूजाने सुरुवातीला तांत्रिक चुका केल्या पण लगेच सावरत पहिल्या फेरीत ती दुसºया स्थानावर राहिली. अंतिम फेरीत लिजीकडून कडवे आव्हान मिळाल्यानंतरही फायनलदरम्यान पूजाच्या बंदूकचे ब्लार्इंडर पडले. तरीही अखेरचे काही शॉट तिने डोळे बंद करीत मारले . त्याआधी पात्रता फेरीत पूजाला ४१८ आणि मेंगयाओला ४१८.६ तर लिजीला ४१७.७ गुण मिळाले होते.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments