Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पी.व्ही. सिंधूला विजेतेपद

Webdunia
सोमवार, 17 डिसेंबर 2018 (12:02 IST)
पी. व्ही. सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहारावर जबरदस्त मात करत वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन  स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सिंधूने ओकुहारावर 21-19,21-17 अशी मात करत या किताबावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे सिंधूने वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेचे पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले आहे.
 
महिला एकेरीच्या उपांत्य लढतीत सिंधूने थायलंडच्या रॅचनोक इन्टॅननवर 21-16,25-23 अशी मात करत अंतिम फेरीत स्थान पटकावले होते. आज तिची द्वितीय मानांकित ओकुहाराशी लढत झाली. यापूर्वी तब्बल बारावेळा आमनेसामने आलेल्या या दोघींनी प्रत्येकी सहावेळा बाजी मारली आहे. त्यामुळे या दोघींच्या आजच्या लढतीकडे संपूर्ण बॅडमिंटन जगताचे लक्ष लागले होते. पण कोणत्याही दबावाखाली न येता सिंधूने नैसर्गिक खेळाचे प्रदर्शन घडवत ओकुहारावर मात केली.
 
सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत ओकुहारावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. सामन्याचा पहिला पॉइंट ओकुहाराने जिंकला असला तरी सिंधूने सामन्यात पुनरागन करताना अप्रतीम स्मॅश लगावत पॉइंटसची लयलूट केली. सिंधूने 5-1 ने आघाडी घेतल्यानंतर ओकुहारानेही चांगला खेळ करत 7-5 ने हे अंतर कमी केले. मात्र त्यानंतर सिंधूने कोर्ट कव्हर करत ओकुहाराला काही चुका करण्यास भाग पाडले. त्यामुळे ब्रेकपर्यंत सिंधूने 11-6 ची आघाडी घेतली होती.
 
ब्रेकनंतरही सिंधूने चांगला खेळ करत ओकुहारावर 14-6 ने आघाडी घेतली. त्यामुळे सिंधू हा सामना लिलया जिंकणार असल्याचे वाटत असतानाच ओकुहाराने डावपेचात बदल केला. ओकुहाराने रणनीती बदलत चांगले कोर्ट कव्हर केले. त्यामुळे एकवेळ अशी आली की, सिंधूला पॉइंट मिळवण्यासाठी झगडावे लागले. रणनीती बदलल्याचा फायदा उठवणार्‍या ओकुहाराने सामना 16-16 असा बरोबरीत आणला. त्यामुळे सामन्याची उत्कंठा अधिकच वाढली होती. त्यानंतर सिंधूने अत्यंत सावध खेळी करत 20-17 ने आघाडी घेतली खरी पण त्यानंतर ओकुहारानेही दोन पॉइंट खिशात घातल्याने सामना अधिक रोमांचक झाला. परंतु, सिंधूने पुन्हा एकदा संयमी आणि आक्रमक खेळीचे प्रदर्शन घडवत पहिला गेम 21-19 ने जिंकला.
 
दुसर्‍या गेमच्या सुरुवातीलाच 3 पॉइंटस मिळवून सिंधूने सामन्यावर दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र ओकुहारानेही कडवी झुंजदेत सामन्यातील आपले आव्हान संपुष्टात आले नसल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. ब्रेकपर्यंत 11-9 ची आघाडी घेतलेल्या सिंधूने दुसरा गेमही 18-16 च्या फरकाने जिंकून वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
 
सिंधुने भारतासाठी हा इतिहास रचला. ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. हा अंतिम सामना एक तासाचा ठरला. सिंधूने या वर्षातील पहिले विजेतेपद मिळविले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

विनोद तावडे यांनी राहुल-खर्गे यांच्या विरोधात कोर्टाची नोटीस बजावली

Hockey:भारतीयमहिला संघाने चीनचा पराभव केला, सामना1-0 ने जिंकला

लग्नाच्या मंचावर हृदयविकाराच्या झटक्याने मित्राचा मृत्यू

ऑस्ट्रेलियाने सलग तिसऱ्यांदा डेव्हिस कप उपांत्य फेरी गाठली

ठाणे जिल्ह्यात तीन वर्षांच्या भाचीच्या हत्येप्रकरणी मामाला अटक

पुढील लेख
Show comments