Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मल्ल सुशिल कुमारचा धक्‍कादायक पराभव

Webdunia
सोमवार, 20 ऑगस्ट 2018 (16:46 IST)
भारताचा आघाडीचा मल्ल सुशिल कुमारयाला आपल्याच पहिल्या सामन्यात बहरिनच्या अदाम बातोरोव्हकडून पराभूत व्हावे लागल्याने पात्रता फेरीतच त्याचे आव्हान संपुष्टात आले असून दुसरा मल्ल बजरंग पुनियाने 65 किलो वजनी गटामध्ये आशिया क्रीडा स्पर्धेत दमदार सुरुवात केली असून पहिल्याच लढतीत बजरंगने 65 किलो वजनीगटात विजय मिळवत थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्‍चीत केला होता. यावेळी त्याने 65 किलो वजनी गटात आपला धडाकेबाज फॉर्म कायम राखत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. तर उपान्त्य फेरीतही त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याचा एकतर्फी पराभव करत अंतीम फेरी गाठुन भारताचे पदक निश्‍चीत केले.
 
बजरंगने पहिल्याच लढतीत सुंदर खेळ केला. खेळातील तांत्रिक गोष्टी त्याने घोटवून घेतल्या होत्या आणि तेच या सामन्यात पाहायला मिळाले त्यामुळे बजरंगने पिछाडी भरुन काढत उझबेगिस्तानच्या मल्लावर 13-3 अशी मात करत पुढील फेरीत प्रवेश केला. आपल्या चतुर आणि आक्रमक खेळाने बजरंगने पहिल्या लढतीत विजय मिळवला. तर उपान्त्य फेरीत बजरंगने मंगोलियाच्या प्रतिस्पर्ध्यावर 10-0 ने मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. बजरंगच्या या विजयासह एशियाड खेळांमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्‍चीत झालं आहे.
 
बहारिनचा प्रतिस्पर्धी मल्ल ऍडम बतिरोव्हने सुशीलवर 5-3 ने मात करत सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात सुरुवातीला 2-0 आघाडी घेतल्यानंतर केलेला बचावात्मक खेळ सुशीलला चांगलाच महागात पडला आहे. आता ऍडम बतिरोव्ह अंतिम फेरीत पोहचला असता तर सुशीलला रेपीचाच प्रकारात कांस्यपदकासाठी खेळण्याची संधी मिळणार होती. मात्र, पहिल्या फेरीत सुशील कुमारवर मात करणाऱ्या ऍडम बतिरोव्हला उपांत्य फेरीत जपानच्या युही फुजीनामीकडून पराभव स्विकारावा लागला. यामुळे सुशील कुमारची रेपिचाजची संधी हुकली. तर 86 किलो वजनी गटात भारताच्या पवन कुमारची कंबोडियाच्या हेंग वुथीवर 8- 0 ने मात करत पुढील फेरीत प्रवेश निश्‍चीत केला आहे.
 
यावेळी 57 किलो वजनी गटात संदीप तोमरला पराभवाचा सामना करावा लागला आहे. संदीप तोमर इराणच्या रेझा अत्रीकडून पराभूत झाला असून रेझाने संदीपची झुंज मोडून काढत 15-9 अशा फरकाने सामना जिंकला. रेझा अत्री अंतिम फेरीत गेल्यास रेपिचाज प्रकारात संदीपला कांस्यपदकासाठी खेळण्याची संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments