Marathi Biodata Maker

युकी भांब्रीची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Webdunia
शनिवार, 5 ऑगस्ट 2017 (13:20 IST)
जागतिक क्रमवारीत 200व्या स्थानी असलेल्या भारताच्या टेनिसपटू युकी भांब्रीने सिटी ओपन टेनिस स्पर्धेतील शानदार प्रदर्शन कायम ठेवत उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. युकी भांब्रीने सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत उप उपान्त्यपूर्व फेरीत ग्युदो पेल्ला याला पराभूत केले.
 
सहाव्या मानांकित फ्रान्सच्या मोनफिल्सला पराभूत करत उलटफेर करणाऱ्या युकी भांब्रीने अर्जेटिनाच्या ग्युदो पेल्ला याच्या तीन सेटपर्यंत झालेल्या संघर्षपूर्ण सामन्यात पराभव केला. हा सामना 6-7(5), 6-3, 6-1 असा जिंकत त्याने अंतिम आठमध्ये स्थान निश्‍चित केले आहे.
 
एटीपी स्पर्धेतील मुख्य फेरीत प्रथमच युकीने सलग तिन्ही सामने जिंकले आहे. युकीचा आता उपान्त्य फेरीत दक्षिण आफ्रिकाच्या केव्हिन अँडरसन याच्याशी लढत होणार आहे. अँडरसनने अन्य एका सामन्यात अग्रमांनाकित डोमॉनिक थिएम याचा 6-3, 6-7, 7-6 असा पराभव करत स्पर्धेत आणखी एक रोमांचिक विजय मिळविला. त्याने सुमारे तीन तास लढत देत हा सामना जिंकला.
 
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

खलिस्तानी दहशतवादी सुखजिंदर सिंग याने भाजप कार्यालयाबाहेर बॉम्बस्फोट घडवून आणला

LIVE: लाडकी बहीण योजना: eKYC ची अंतिम मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवली

महाराष्ट्रात प्रवास महाग झाला, द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवर टोल दरात वाढ

मोदींच्या आश्वासनांवर विश्वास ठेवू नका', संजय राऊत यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

DC vs LSG : दिल्लीने नाणेफेक जिंकून लखनौला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले; दोन्ही संघांचे प्लेइंग ११

पुढील लेख
Show comments