Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी कर्करोगाने निधन

Webdunia
शुक्रवार, 30 डिसेंबर 2022 (10:13 IST)
ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचे निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूची पुष्टी त्यांची मुलगी केली नॅसिमेंटो यांनी इंस्टाग्रामवर केली. पेले कोलन कॅन्सरशी झुंज देत होते. त्याने केमोथेरपी उपचारांना प्रतिसाद देणेही बंद केले होते. पेले यांना नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांना श्वसनाचे संक्रमण झाल्याचे आढळून आले. पेले हा आतापर्यंतचा महान फुटबॉल खेळाडू मानले जातात.
तीन वेळा विश्वचषक विजेता आहे. मुलगी केली नॅसिमेंटोने इंस्टाग्रामवर लिहिले - आम्ही जे काही आहोत ते तुमच्यामुळेच आहोत. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो.
 
मिनास गेराइस या ब्राझिलियन राज्यात जन्मलेला, दिग्गज फुटबॉलपटू अजूनही सेलेकाओ (ब्राझील) साठी सर्वाधिक गोल करणारे खेळाडू आहे. त्यांनी  92 सामन्यांत 77 गोल केले. एक व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून, पेलेने एकूण तीन वेळा (1958, 1962, 1970) फिफा विश्वचषक जिंकले जो अजूनही वैयक्तिक फुटबॉलपटूसाठी एक विक्रम आहे.
 
पेले यांचे खरे नाव एडसन अरांतेस डो नॅसिमेंटो होते, परंतु ते पेले म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1940 रोजी ब्राझीलमधील Tres Corações येथे झाला. त्यांना  फिफाचा 'द ग्रेटेस्ट' हा किताबही मिळाला. पेले यांनी तीन विवाह केले होते. त्यांना एकूण सात मुले आहेत.
 
 वयाच्या 82 व्या वर्षी पेले यांनी अखेरचा श्वास घेतला.ते कोलन कॅन्सरशी झुंज देत होते. केमोथेरपीही बराच वेळ चालू होती. पेले यांना 29 नोव्हेंबर रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने साओ पाउलो येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांनी केमोथेरपीला प्रतिसाद देणे बंद केले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पेले यांच्या कोलनमधून गाठ काढण्यात आली होती आणि तेव्हापासून त्यांच्यावर नियमित रुग्णालयात उपचार सुरू होते. 

Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

नाइट्रोजन पान खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलीच्या पोटात झाले छिद्र

या दिवशी महाराष्ट्रात आणि मुंबईत होणार Monsoon ची एन्ट्री, जाणून घ्या मोठे अपडेट

लोकसभा निवडणूक 2024 : महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात 13 सिटांसाठी मतदान

लज्जास्पद! 13 वर्षाच्या मुलाने मोठ्या बहिणीला केले प्रेग्नंट

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केलं

मुंबईमधील फ्लॅटमध्ये वृद्ध दांपत्याची आत्महत्या, दुर्गंधी आल्यामुळे पोलिसांनी तोडले दार

मी सुटणार आहे, मला या तुरुंगात राहू द्या- अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला एनकाऊंटर होण्याची भीती

Bank Holidays: या आठवड्यात फक्त 3 दिवस उघडल्या राहतील बँका, बँकेला चार दिवस सुट्टी! यादी पहा

उत्तर प्रदेशमध्ये 18 फूट खाली कोसळली बस,1 चा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, अपघात की कट?

पुढील लेख
Show comments