Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ट्रॉफी घेताना सुनील छेत्री राज्यपालांसमोर आल्यावर ढकलून बाजूला केल्याचा व्हिडीओ व्हायरल

Webdunia
मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (21:43 IST)
ड्युरंड कप 2022 चे विजेतेपद बेंगळुरू एफसीच्या संघाकडे गेले.अंतिम फेरीत, बेंगळुरूने मुंबई सिटी एफसीचा 2-1 असा पराभव करून स्पर्धा जिंकली. बेंगळुरू संघाने प्रथमच हे विजेतेपद पटकावले आहे. संघाचा कर्णधार सुनील छेत्रीनेही पहिल्यांदाच हे विजेतेपद पटकावले आहे. ही स्पर्धा जिंकल्यानंतर सुनील छेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल ला गणेशन सुनील छेत्रीला दूर ढकलताना दिसत असून सोशल मीडियावर त्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे. 
 
माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रानेही याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. सुनील छेत्रीसोबत घडलेल्या घटनेचा व्हिडिओ शेअर करताना त्याने हे लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. 
<

Disgraceful https://t.co/Tus6U5mKfA

— Aakash Chopra (@cricketaakash) September 19, 2022 >
ड्युरंड चषक 2022 चे विजेतेपद पटकावणारा बेंगळुरूचा कर्णधार सुनील छेत्री याला स्टेजवर बोलावून ट्रॉफी दिली जात होती. यावेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल ला गणेशन हे देखील मंचावर उपस्थित होते आणि खेळाडूंना ट्रॉफी देत ​​होते. ट्रॉफी घेताना सुनील छेत्री ला गणेशनचा समोर आला. त्यानंतर गणेशनने सुनील छेत्रीच्या खांद्यावर हात ठेवून त्याला समोरून दूर केले. अशा स्थितीत सुनील छेत्रीने एका हाताने ट्रॉफी घेतली. 
 
खेळाडूंच्या अपमानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यपालांना प्रचंड ट्रोल केले जात आहे. ड्युरंड कप जिंकल्याबद्दल राज्यपालांचे अभिनंदन असे अनेक वापरकर्त्यांनी लिहिले. त्याचवेळी, आणखी एका यूजरने लिहिले की, या प्रकरणावर राज्यपालांनी माफी मागावी. 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments