Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Tokyo Olympics: भारताच्या ऑलिम्पिकमध्ये 10 मिनिटांत आणखी 2 पदकांची पुष्टी; कुस्तीच्या उपांत्य फेरीत रवी दहिया आणि दीपक पुनिया

Webdunia
बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (09:56 IST)
टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज सकाळी भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कुस्तीच्या 57 किलो वजनी गटात भारतीय कुस्तीपटू रवी दहिया उपांत्य फेरीत आणि 86 किलो वजनी गटात दीपक पुनिया यांनी उपांत्य फेरी गाठली आहे.रवीने बल्गेरियन कुस्तीपटूचा पराभव केला.तर दीपकने चीनच्या पैलवानाचा पराभव केला.
 
या दोघांनी 10 मिनिटांत भारतासाठी 2 पदके निश्चित केली. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची 5 पदके निश्चित झाली आहेत. भारताने आतापर्यंत कुस्तीत 7 पदके जिंकली आहेत. रवी आणि दीपकच्या आधी केडी जाधव, सुशील कुमार (2),योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक यांनी विजय मिळवला आहे.भारताने पुरुषांच्या कुस्तीत 6 पदके जिंकली आहेत.
 
 नीरज चोप्रा भालाफेकमध्ये अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. बुधवारी भारतीय महिला हॉकी आणि बॉक्सर लवलिना बोर्गोहेन यांच्याकडूनही मोठ्या आशा आहेत. हॉकी संघाने आधीच उपांत्य फेरी गाठून आपली सर्वोत्तम कामगिरी दिली आहे. तिला अंतिम फेरी गाठून ती आणखी वाढवायची आहे.
 
लोव्हलीना च्या बाबतीतही असेच आहे. आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पक्क करणाऱ्या लोव्हलिनाला आता रौप्य किंवा सुवर्णपदक मिळवायचे आहे. याशिवाय भारताकडून कुस्ती, अॅथलेटिक्स आणि गोल्फमध्येही चांगली कामगिरी अपेक्षित असेल.

संबंधित माहिती

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments