Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Tokyo Paralympics: प्रवीण कुमारने हाय जंप मध्ये नवीन आशियाई विक्रमासह रौप्य पदक जिंकले

Webdunia
शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (10:59 IST)
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंचे वर्चस्व कायम आहे. प्रवीण कुमारने उंच उडी स्पर्धेत देशाला सहावे रौप्य पदक मिळवून दिले आहे. प्रवीणने 2.07 मीटर लांब उडी घेऊन रौप्य पदक पटकावले. या उंच उडीसह प्रवीणने नवीन आशियाई विक्रमही केला. प्रवीण संपूर्ण सामन्यात उत्कृष्ट फॉर्मात होते, पण शेवटच्या क्षणात पोलॅंड खेळाडू जोनाथनने त्याच्यावर दाब टाकून 2.10 मीटर उडी घेऊन सुवर्ण पदक जिंकले. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे 11 वे पदक आहे.
 
अंतिम सामन्यात प्रवीणची पोलंडच्या जीबीआर जोनाथनशी दमदार लढत झाली आणि सुवर्णपदकासाठी दोघांमध्ये कडा संघर्ष दिसला. प्रवीण पोलंड च्या  खेळाडूला झुंज देत होते,पण जोनाथनच्या 2.10 मीटरच्या लांब उडीशी तो जुळू शकला नाही आणि त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. उंच उडीमध्ये भारताचे हे तिसरे पदक आहे.या पूर्वी  मारीअप्पन थंगावेलू आणि शरद कुमार यांनी रौप्य आणि कांस्यपदके जिंकली आहे. भारताने आतापर्यंत टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 2 सुवर्ण, 6 रौप्य आणि 3 कांस्य अशी 11 पदके जिंकली आहेत.

<

Proud of Praveen Kumar for winning the Silver medal at the #Paralympics. This medal is the result of his hard work and unparalleled dedication. Congratulations to him. Best wishes for his future endeavours. #Praise4Para

— Narendra Modi (@narendramodi) September 3, 2021 >रौप्य पदक जिंकल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रवीणला ट्विट करून त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधानांनी लिहिले, प्रवीण आपल्यावर पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभिमान आहे.हे पदक त्यांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ आहे.आपले अनेक अभिनंदन.आपल्याला भविष्यासाठी शुभेच्छा. पॅरालिम्पिकमधील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

एकनाथ शिंदे केंद्रात मंत्री होणार नाही, संजय शिरसाट यांचा खुलासा

शाळेत बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी

LIVE: दिल्लीनंतर मुंबईत होणारी महायुतीची बैठकही रद्द, हे कारण आहे

दिल्लीनंतर मुंबईत होणारी महायुतीची बैठकही रद्द, हे कारण आहे

PKL 2024: गुजरात जायंट्स कडून बंगाल वॉरियर्सचा 2 गुणांनी पराभव केला

पुढील लेख
Show comments