Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Wimbledon Final : अल्काराझचे जबरदस्त पुनरागमन, जोकोविचचा पराभव करून विम्बल्डन जिंकणारा तिसरा स्पॅनिश खेळाडू ठरला

Webdunia
सोमवार, 17 जुलै 2023 (07:34 IST)
स्पेनच्या कार्लोस अल्काराझने इतिहास रचला आहे. तो विम्बल्डन 2023 चा चॅम्पियन बनला आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या अल्काराझने पाच सेटच्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा  1-6, 7-6(6), 6-1, 3-6, 6-4  असा  पराभव केला. 20 वर्षीय अल्काराज हा विम्बल्डन जिंकणारा स्पेनचा तिसरा खेळाडू ठरला. याआधी सांतानाने 1966 मध्ये विम्बल्डन आणि 2008 आणि 2010 मध्ये राफेल नदालने विजेतेपद पटकावले होते. तब्बल 12 वर्षांनंतर स्पेनच्या एका खेळाडूने हे ग्रँडस्लॅम जिंकले आहे.
 
अल्काराझचे हे दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. त्यापूर्वी 2022 मध्ये यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. एवढेच नाही तर 2017 नंतर विम्बल्डनला नवा चॅम्पियन मिळाला आहे. जोकोविचने 2018, 2019, 2021 आणि 2022 मध्ये हे विजेतेपद पटकावले होते. त्याच वेळी, कोरोनामुळे ही स्पर्धा 2020 मध्ये होऊ शकली नाही. 2017 मध्ये स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर चॅम्पियन बनला होता.याआधी शनिवारी झेक प्रजासत्ताकच्या 24 वर्षीय मार्केटा वोंड्रोसोव्हाने ट्युनिशियाच्या ओन्स झेब्युरचा 6-4, 6-4 असा पराभव करून विम्बल्डन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.
 
अल्काराझने हे रेकॉर्ड केले
अल्काराझने जोकोविचच्या विम्बल्डनमध्ये सलग 34 सामने जिंकण्याच्या विक्रमाला पूर्णविराम दिला. 
बोरिस बेकर आणि ब्योर्न बोर्ग यांच्यानंतर तो तिसरा सर्वात तरुण विम्बल्डन चॅम्पियन बनला.
21 वर्षांचा होण्यापूर्वी विम्बल्डन जिंकणारा अल्काराज हा बेकर आणि ब्योर्ननंतर ओपन एरामधील तिसरा खेळाडू आहे.
दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणारा तो पाचवा सर्वात तरुण खेळाडू आहे. 2022 मध्ये अल्काराझने यूएस ओपन जिंकले.
ग्रँड स्लॅम स्पर्धेत जोकोविचला पराभूत करणारा अल्काराझ हा दुसरा सर्वात तरुण खेळाडू आहे.
 
अंतिम फेरीत दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. पहिल्या सेटमध्ये 36 वर्षीय जोकोविचने 6-1 असा विजय मिळवला.
यानंतर अल्काराझने दुसऱ्या सेटमध्ये जबरदस्त पुनरागमन केले. एका टप्प्यावर सेट 6-6 असा बरोबरीत होता. त्यानंतर टायब्रेकर खेळला गेला, जो अल्काराझने 8-6 ने जिंकून सेट 7-6 ने जिंकला.
तिसऱ्या सेटमध्येही 20 वर्षीय स्पॅनियार्डने जबरदस्त खेळ दाखवत त्याच्यापेक्षा अनुभवी जोकोविचचा 6-1 असा पराभव केला.
चौथ्या सेटमध्ये जोकोविचने जबरदस्त पुनरागमन करत आपले नाव कोरले. सर्बियन खेळाडूने तो 6-3 असा जिंकला. चौथ्या सेटमध्ये एका वेळी जोकोविच 2-0 ने पिछाडीवर होता. त्यानंतर त्याने पुनरागमन करत 6-3 असा विजय मिळवला.
त्याचवेळी अल्काराझने पाचव्या आणि शेवटच्या सेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत 6-4 असा विजय मिळवला. सामन्यादरम्यान त्याने असे अनेक शॉट्स खेळले, ज्याने चाहत्यांना आणि खुद्द जोकोविचलाही आश्चर्याचा धक्का बसला. जोकोविचनेही अनेक शॉट्सवर अल्काराझचे कौतुक केले.
 
जोकोविचने फायनल जिंकली असती तर हे त्याचे24 वे ग्रँडस्लॅम ठरले असते आणि त्याने मार्गारेट कोर्टच्या पुरुष आणि महिलांमध्ये सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली असती. तसेच जोकोविचचे हे एकूण आठवे आणि सलग पाचवे विम्बल्डन विजेतेपद ठरले असते. या दोन्ही बाबतीत त्याने फेडररची बरोबरी केली असती. मात्र, यापैकी काहीही होऊ शकले नाही.
 
 
 
Edited by - Priya Dixit   
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

'संजय राऊतंचं विमान लँड करण्याची गरज', भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा जोरदार हल्ला

LIVE: देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

Maharashtra Election Results मोठी बातमी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात

Mahayuti's Victory 5 Reasons महाराष्ट्रात महायुतीच्या विजयाची 5 मोठी कारणे, भाजपची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी

पुढील लेख
Show comments