Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चानूला सुवर्णपदक

चानूला सुवर्णपदक
नवी दिल्ली , शुक्रवार, 1 डिसेंबर 2017 (12:40 IST)
भारताच्या मीराबाई चानू हिने जागतिक भारत्तोलन (वर्ल्ड वेटलिफ्टिंग)  चॅम्पियनशिपमध्ये विश्‍वविक्रम नोंदवून जेतेपदाला गवसणी घातली आहे. तिने 48 किलो वजनी गटात 194 किलो (स्नॅचमध्ये 85 आणि क्लीन-जर्कमध्ये 109 किलो) वजन उचलून भारताला दोन दशकांनंतर सुवर्णपदक मिळवून दिले आहे. अशी कामगिरी करणारी चानू दुसरी भारतीय वेटलिफ्टर ठरली आहे. 22 वर्षांपूर्वी कर्नाम मल्लेश्‍वरी हिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती.
 
अमेरिकेतील अनाहिममध्ये झालेल्या जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीपमध्ये चानूने सुरुवातीला स्नॅचमध्ये 85 किलो वजन उचलले. त्यानंतर क्लीन-जर्कमध्ये 109 किलो वजन उचलून तिने सुवर्णपदकावर नाव कोरले. यापूर्वी कर्नाम मलेश्‍वरी हिने 1994 आणि 1995 मध्ये जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. तब्बल 22 वर्षांनी भारताला या स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे.
 
थायलंडच्या सुकचारोनला रौप्य, तर सेगुरा अना हिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय रेल्वे खात्यात काम करणार्‍या चानूला 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकता आले नव्हते, ती कसर तिने आज सव्याज भरून काढली. बक्षीस वितरणावेळी तिरंगा फडकताना पाहून 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेची रौप्यपदक विजेती असलेल्या चानूचे डोळे अभिमनाने भरून आले.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

WhatsAppच्या नवीन अपडेटमुळे चॅटमध्ये चालेल यूट्यूब व्हिडिओ