Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आजपासून विम्बलडनची सुरुवात!

वेबदुनिया
सोमवार, 20 जून 2011 (15:47 IST)
ND
रॉजर फेडरर सातव्यांदा जिंकून पीट सॅम्परसशी बरोबरी करणार का? राफेल नदाल, एन्डी मरे, नोव्हाक डोक‍ाव्हिच यांचे आव्हान तो कसा पार करेल? महिला गटात चीनची ली ना दुसर्‍यांदा इतिहास रचणार का? वर्षभरानंतर ग्रॅण्डस्लॅम ख ेळणार्‍या विल्यम्स भगिनी पुन्हा आपला दबदबा राखणार का? डेन्मार्कची कार्लोइन वोजनियास्की नंबर वन स्थान कायम राखणार का? या असंख्य प्रश्नांची उत्तरे आजपासून सुरू होणार्‍या विम्बलडमधून मिळणार आहेत.

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यानंतर फेडररला त्यांनतर एक ही ग्रॅण्डस्लॅम ‍जिंकता आलेले नाही. सहा वेळ विम्बल्डन जिंकणारा फेडरर गेल्या वर्षी उपांत्यपूर्व फेरीत हारला होता. फेडररला पुन्हा एकदा नदालकडून कडवे आव्हान मिळू शकते. या शिवाय ऑस्ट्रेलियन ओपन विजेता सार्बिया नोव्हाक आणि यजमानांचा मरेही प्रबळ दावेदार आहेत.

तसेच महिला गटात सेरेना आणि व्हीनस कसे पुनरागमन करतात याची उत्सुकता आहे. सेरेनाचे 4 तर व्हीनसने पाच वेळा अजिंक्यपद पटकावले आहे. फ्रेंच ओपन जिंकून इतिहास रचणारी चीनची ली ना आकर्षणाचा केंद्र आहे.

भारताचे सर्व मदार पेस आणि भूपती जोडीवर असणार आहे. एकेरीत सोमदेव बर्मन आणि सानिया मिर्झा आपली कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करतील. गेल्या वर्षी सोमदेव विम्बल्डनच्या पात्रता फेरीतच गारद झाला होता. सानिया 2008 नंतर ग्रॅण्डस्लॅमच्या दुसर्‍या फेरीतून पुढे जाऊ शकली नाही. रोहन बोपन्ना आणि त्याचा पाकचा जोडीदार एहसाम अल कुरेशीही कामगिरीकडेही लक्ष असणार आहे. सोमदेव दुहेरीत जपानच्या केई निशिकोरीसमवेत उतरणार आहे. सानिया रशियाच्या एलिनासमवेत खेळणार आहे. सानिया-एलीना फ्रेंच ओपनमध्ये उपविजयी ठरल्या होता.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments