Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तब्बल 24 वर्षांनंतर जर्मनी जगज्जेता

Webdunia
सोमवार, 14 जुलै 2014 (10:23 IST)
रिओ-द-जिनेरिओ- अर्जेन्टीनाचा 1-0 असा धुव्वा उडवल्यानंतर जर्मनीने तब्बल 24 वर्षांनंतर चौथ्यांदा 'फिफा'च्या विश्वचषका आपले नाव कोरले. सबस्टिट्यूट फुटबॉलर म्हणून आलेल्या मारियो गोट्झा याने गोल झळकावत जर्मनीना विजय मिळवून दिला. 
 
मारियो गोट्झाने 113 व्या मिनिटात आंद्रे शर्लेच्या पासवर गोल झळकावत जर्मनीच्या टीमला वर्ल्ड चॅम्पियन बनवले. एक्स्ट्रा टाईममध्ये गेलेल्या या मॅचमध्ये जर्मनीना अर्जेन्टाईन टीमवर 1-0 अशी करून विजयाला गवसणी घातली. फुटबॉलच्या इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकन धर्तीवर युरोपियन टीम चॅम्पियन बनली आहे. 
 
24 वर्ष जर्मनीच्या फुटबॉल फॅन्सनी आतूरतेने वाट पाहिली होती. तो क्षण अखेर मारियोच्या 'गोल्डन गोल'ने आपल्या फॅन्सना दाखवला. जर्मनीच्या प्रत्येक फुटबॉलरच्या चेहर्‍यावर विजेतेपदाचा आनंद ओसंडून वाहत होता. 90 मिनिटे दोन्ही टीम्सना गोल करण्यात अपयश आले होते. सामन्यात दोन्ही टीम्सने अफलातून खेळ केला. 
 
अर्जेन्टाईन गोलकीपर सर्जियो रोमेरोनंही जर्मनी टीमचे अनेक प्रयत्न हाणून पाडले. मात्र, मॅचच्या 21 व्या मिनिटाला गोन्झालो हिग्वेनला गोल करण्याची नामी संधी चालून आली होती. मात्र, त्याला अर्जेन्टीनाला आघाडी मिळवून देता आली नाही आणि त्याची ही चूक अर्जेन्टीनाला चांगलीच महागात पडली. हिग्वेनने यानंतर गोल झळकावला खरा मात्र रेफ्रींनी तो ऑफसाईड ठरवला. 
 
लिओनेल मेसीची जादूही या मॅचमध्ये पाहायला मिळाली नाही. त्याला आपल्या टीमसाठी फायनल मॅचमध्ये गोल करता आला नाही. निर्धारित 90 मिनिटांमध्ये दोन्ही टीम्सना गोल करता आला नाही आणि मॅच एक्स्ट्रा टाईममध्ये गेली. 
 
जर्मनीचे कोच जोकिम लो यांनी मारियो गोट्झाला यावेळी गुरुमंत्र दिला. आणि लो यांचा तोच कानमंत्र यशस्वी ठरला. गोट्झाने गोल झळकावत आपल्या कोचचा विश्वास सार्थ ठरवला. गोट्झाने अफलातून गोल करत आपल्या टीमला विजय साकारुन दिला. या वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा सबस्टिट्यूट फुटबॉलरच टीमसाठी विजयाचा शिल्पकार ठरला. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments