Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दीपिकाकुमारी, बोंबायला उपउपांत्यपूर्व फेरीत

Webdunia
गुरूवार, 11 ऑगस्ट 2016 (10:47 IST)
ऑलिम्पिकच्या महिला वैयक्तिक रिकर्व्ह गटात 'राऊंड ऑफ ६४' च्या सामन्यात बोंबायलाने ऑस्ट्रियाच्या लॉरेन्स बेलडॉफवर ६-२ असा विजय साजरा तर दीपिका कुमारीने जॉर्जियाच्या क्रिस्टीनचा ६-४ ने पराभव केला.

काही मिनिटांच्या फरकाने खेळविण्यात आलेल्या दोन्ही लढतीत बोंबायला आणि दीपिकाने उत्कृष्ट कामगिरीसह उपाउपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले आहे. 'राऊंड ऑफ ३२' च्या सामन्यात बोंबायला तैपेईची लिन शिह चियाचा ६-२ अशा फरकाने पराभव केला. तर दीपिकाकुमारीने इटलीच्या सार्तोरीचा ६-२ अशा फरकाने पराभव केला.या विजयानंतर बोंबायला आणि दीपिका कुमारीने राऊंड ऑफ ३२ मध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे.

बोंबायलाने बेलडॉफविरुद्ध पहिला सेट गमाविल्यानंतर शानदार कामगिरीसह पुढील तिन्ही सेट जिंकले. पहिला सेट तिने २४-२७ ने गमाविला होता. नंतर मात्र २८-२४, २७-२३ आणि २६-२४ असे गुण नोंदविले. दुसऱ्या सेटमध्ये बोंबायलाने १०, ९, ९ तसेच तिसऱ्या सेटमध्ये ९, ९, ९ गुणांचा वेध घेतला.

चौथ्या सेटमध्ये ९, ९ आणि ८ गुण नोंदविले. बोंबायलाने दुसऱ्या सामन्यात तैपेईची चिया हिच्यावर २७-२४, २७-२४, २८-२६ असा विजय साजरा केला. बोंबायलाने चारही सेटमध्ये प्रत्येकी एकदा १० गुण नोंदवित कमाल केली. चियाने तिसऱ्या सेटमध्ये लागोपाठ दोनदा १० गुणांचा वेध घेताच चुरस निर्माण झाली होती. पण बोंबायलाने चौथ्या सेटमध्ये २८-२६ अशी दोन गुणांची आघाडी घेत पुढील फेरीत स्थान निश्चित केले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments