Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मारिया शारापोवा विजेता!

वेबदुनिया
मंगळवार, 1 मे 2012 (14:55 IST)
WD
रशियाच्या मारिया शारापोवाने पोर्श्‍च ग्रांप्री टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात तिने बेलारूसच्या व्हिक्‍टोरिया अझारेन्कावर 6-1, 6-4 अशी मात केली. जागतिक क्रमवारीत अझारेन्का "नंबर वन' आहे. मोसमातील हे तिचे पहिलेच जेतेपद आहे. या कामगिरीसह शारापोवाला पोर्श्‍चची नवीकोरी कार बक्षीस मिळाली.

शारापोवासाठी ही कामगिरी सुखद ठरली. मोसमात चौथ्यांदा तिने अंतिम फेरी गाठली होती. ऑस्ट्रेलियन ओपन आणि इंडियन वेल्स या दोन स्पर्धांत तिला अझारेन्काकडूनच पराभूत व्हावे लागले होते. या वेळी शारापोवाने सर्व्हिसच्या जोरावर आक्रमक खेळ केला. खांद्यावरील शस्त्रक्रियेनंतर तिने सर्वोत्तम खेळ केला. तिने फोरहॅंडवर मारलेले बिनतोड फटके उल्लेखनीय ठरले. याशिवाय तिने बॅकहॅंडवरही सफाईदार खेळ केला. अझारेन्काला मनगटाच्या दुखापतीने त्रस्त केले होते. अझारेन्काने मोसमात 29 विजय आणि दोन पराभव अशी कामगिरी केली आहे. या पराभवानंतरही तिच्या अव्वल स्थानाला धोका नसेल.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments