Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

यूएस ओपन: सानिया मिर्झा-मार्टिना हिंगीसला विजेतेपद

Webdunia
सोमवार, 14 सप्टेंबर 2015 (10:04 IST)
न्यूयॉर्क- भारताच्या सानिया मिर्झा आणि स्वीत्झर्लडची मार्टिना हिंगीस यांनी विम्बल्डनपाठोपाठ अमेरिकन ओपनच्या महिला दुहेरीचे विजेतेपद पटकाण्याचा पराक्रम गाजवला.
 
सानिया-मार्टिना जोडीने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या केसी डेलाक्वा आणि कझाकस्तानच्या यारोस्लाव्हा श्वेदोवा जोडीचा 6-3, 6-3 असा सरळ सेट्समध्ये पराभव करून विजय मिळवला. सानिया-मार्टिनाने केवळ 70 मिनिटांत हा सामना जिंकला.
 
सानिया-मार्टिनाचे यंदाच्या वर्षातले हे सलग दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. याआधी सानिया-मार्टिना जोडीने विम्बल्डनच्या महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. दरम्यान, सानिया मिर्झाचे आपल्या कारकीर्दीतले हे पाचवे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले. सानियाने मिश्रदुहेरीत ऑस्ट्रेलियन, फ्रेंच आणि अमेरिकन ओपन जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे.
 
याआधी हिंगीसने भारताच लीएंडर पेस यांच्या साथीमध्ये अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच मिश्रदुहेरीत संभाव्य विजेत्यांना साजेशी कामगिरी करीत त्यांनी विजेतेपद पटकावले होते.

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

ब्रिटिश संसदेने रवांडा निर्वासन विधेयक मंजूर केले

मलेशियामध्ये दोन नौदलाचे हेलिकॉप्टरची जोरदार धडक सर्व 10 क्रू मेंबर्स ठार

IPL 2024: 56 चेंडूत शतक झळकावून रुतुराज गायकवाडने इतिहास रचला

LSG vs CSK : मार्कस स्टॉइनिसने IPL मधील 13 वर्षे जुना विक्रम मोडला

टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचची वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून 5 व्यांदा निवड

Show comments