Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा: पाच दोषींना कारावासाची शिक्षा

Webdunia
गुरूवार, 3 सप्टेंबर 2015 (10:08 IST)
नवी दिल्ली- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी रस्त्यांवर लावण्यात आलेल्या दिव्यांच्या कामामध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआय न्यायालयाने चार दोषींना चार वर्षाची तर एकाला सहा वर्षाची शिक्षा ठोठावली. 
 
एमसीडीचे चार अधिकारी तसेच स्वेका पॉवर टेकचे कार्यकारी संचालक पी.पी. सिंह अशा पाचजणांचा शिक्षा झालेल्यांमध्ये समावेश आहे. सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायमूर्ती ब्रिजेश गर्ग यांनी ही शिक्षा सुनावली आहे. 2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामधील घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 10 खटले दाखल करण्यात आले आहेत. शिक्षा झालेला हा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पहिलाच घोटाळा आहे. सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात दोषींना जास्तीत जास्त म्हणजे 7 वर्षाच कारावासाची शिक्षा ठोठावण्याची मागणी केली होती. त्यापूर्वी न्यायालयाने संबंधित पाचजणांना दोषी ठरविले होते. आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात कमीतकमी शिक्षा देण्याची विनंती केली होती. 
 

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

Show comments