rashifal-2026

सानिया महिला दुहेरीमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल

Webdunia
सोमवार, 13 एप्रिल 2015 (11:18 IST)
सानिया मिर्झाने जागतिक क्रमवारीत महिला दुहेरीमध्ये अव्वल स्थान पटकावत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. महिला दुहेरीमध्ये अव्वल ठरणारी सानिया ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. सानियाने मार्टिना हिंगीसच्या साथीने फॅमिली सर्कल कप खिशात घातला.
 
सानिया आणि मार्टिना या जोडीने कॅसी डेलाक्वा आणि दार्या जुराक या जोडीवर 6-0, 6-4 अशी मात केली. विजेतेपदासोबतच सानियाने अव्वल स्थानालाही गवसणी घातली आहे.इंडियन वेल्स आणि मयामि ओपनपाठोपाठ सानिया आणि मार्टिनाचे हे सलग तिसरे जेतेपद ठरले. सानिया आणि मार्टिनाने टीम म्हणून सलग 14 वेळा विजय मिळवला आहे.
 
महिला दुहेरीमध्ये अव्वल ठरणारी सानिया ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. याआधी 90च्या दशकात लिअँडर पेस आणि महेश भूपतीने अशी कामगिरी बजावली होती. काही दिवसांपूर्वीच बॅडमिंटनमध्ये फुलराणी सायना नेहवालने पहिले स्थान पटकावले होते. त्यानंतर टेनिसमध्ये जागतिक क्रमवारीत सानियाने मिळवलेल्या वर्चस्वामुळे भारतीयांची कॉलर पुन्हा टाईट झाली आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

FIFA विश्वचषक 2026 च्या संघाची घोषणा, रोनाल्डो या गटात असेल

इंडिगो एअरलाइन्स संकट प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले

ग्वाडेलूपमध्ये अनियंत्रित कारने ख्रिसमसच्या गर्दीवर धडक दिली, 10 जणांचा मृत्यू

LIVE: शिक्षक संघटनांचा सरकारविरुद्ध निषेध, अमरावतीतील सर्व शाळा बंद

सायको किलर आईने 4 चिमुकल्यांचे जीव घेतला

Show comments