Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सानियासारखी जोडीदार मिळणे माझे भाग्य: मार्टिना

Webdunia
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2015 (10:38 IST)
मुंबई- एकेकाळी महिला गटात जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान असणारी स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीसने 2015- 16 च्या हंगामात भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झासोबत तब्बल नऊ जेतेपद पटकावली आहेत. सानिया मिर्झासारखी जोडीदार मिळणे हे आपले भाग्य असल्याचे मुंबई दौर्‍यावर आलेल्या मार्टिनाचे माध्यमाशी बोलताना सांगितले.
 
सानियाचा टेनिसकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. शिवाय, सानिया एक उत्कृष्ट टेनिसपटू असल्याचा दाखालाही तिने यावेळी दिला. अलीकडेच वर्षातील शेवटची स्पर्धा असलेल्या डब्लुटीए स्पर्धेचे जेतेपद सानिया- हिंगीस जोडीने पटकावताना हंगामाची यशस्वी सांगता केली होती. तसेच या जोडीने विम्बल्डन व अमेरिकन ओपनचेही जेतेपद पटकावले आहे
 
मार्टिना हिंगीस सध्या व्यावसायिक स्पर्धेसाठी मुंबई दौर्‍यावर आली आहे. यादरम्यान हिंगीसने माध्यामांशी संवाद साधला. सानियासोबत खेळताना या वर्षातील हंगमाची यशस्वी सांगता झाली. सानिया एक महान खेळाडू असून आम्हा दोघीत चांगली मैत्री आहे. शिवाय, ही मैत्री मैदान व मैदानाबाहेर आम्ही तशीच जोपासली असल्याचे हिंगीसने यावेळी सांगितले. सानियाचा बॅकहँड पॉवरफूल आहेच शिवाय तिच्या नेटजवळच्या मोठी सुधारणा झाली असल्याचा दाखलाही तिने यावेळी दिला.
 

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

Show comments