मीनाकुमारी म्हणजे बॉलीवूडला पडलेले एक सुंदर स्वप्न होते. जे अल्पकाळासाठी दिसले आणि भंग पावले. ते भंगले तेव्हा लोकांच्याही डोळ्यांतून अश्रू वाहिले. ' ट्रॅजेडी क्वीन' हा किताब(?) मीनाकुमारीला मिळाला. पण तिचे खासगी आयुष्यही एक 'ट्रेजेडी' च ठरली. तिचे सौंदर्य आणि अभिनयाला एक कारूण्याच ी झाक होती.
उगवत्या सूर्याला नमस्कार करणार्या बॉलीवूडमध्ये भूतकाळातल्या तर सोडून द्या पण कालचा कलावंत आज अपयशी ठरला तरी ढुंकून पाहिले जात नाही. मीनाकुमारीच्या बाबततही असेच घडले. एकेकाळची ही 'क्वीन' नंतर पार विस्मरणात गेली.
नायिका म्हणून अजरामर ठरलेल्या मीनाकुमारीचा सुरवातीचा प्रवास बालकलाकार म्हणूनच झाला. खरे तर कोवळ्या वयातच मीनाला कुटुंबाच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे चित्रपटात काम करावे लागले. 'लेदरफेस' या 1939 मध्ये आलेल्या चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम करणार्या मीनाचे वय केवळ सहा वर्षे होते. विजय भट्ट यांच्या या चित्रपटात बालकलाकार मीनाला पंचवीस रुपये मानधन मिळाले होते.
13-14 वर्षे या कोवळ्या वयातच तिला नायिकेचे रोल मिळायला सुरुवात झाली. काही गाणीही तिने गायली. बालकलाकार म्हणून बर्याच चित्रपटात काम केल्यानंतर विजय भट्ट यांनीच तिला ' बैजू बावरा' मध्ये प्रमुख भूमिका देऊन प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन बसविले. 1952 साली रिलीज झालेल्या या चित्रपटाने मुंबईत एकाच थिएटरमध्ये शंभर आठवडे चालून एक रेकॉर्ड नोंदविला होता. याच वेळी फिल्मफेअर पुरस्कारांची सुरुवात झाली.
ND
ND
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पहिला फिल्मफेअर पुरस्का र 'बैजू बावरा' तील अभिनयासाठी तिला प्रदान करण्यात आला होता. विशेष म्हणजे सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचे लागोपाठ बारा पुरस्का र पटकाविणारी ती पहिली अभिनेत्री ठरली. नौशाद यांचे संगीत असणार्या बैजू बावरातील तिची गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत. त्यानंतर बर्याच चित्रपटात तिने उल्लेखनीय भूमिका साकारल्या. मात्र पाकिजातील तिची भूमिका आजही आदर्श मानली जाते. अशी भूमिका साकारण्याची आपली इच्छा असल्याचे सगळ्याच नवोदीत अभिनेत्री त्यांच्या मुलाखतीत सांगत असतात.
ND
ND
' पाकिजा' हे कमाल अमरोहींचे सुंदर स्वप्न होते. हा चित्रपट बनण्यास चौदा वर्षांचा कालावधी लागला: या दरम्यान मीनाने कमाल अमरोहींशी 1964 साली निकाह केला. आपल्या दीर्घ आजारातही तिने हा चित्रपट पूर्ण केला. त्याच काळात भारत-पाक युद्धास सुरुवात झाली. आणि चित्रपट सुपर फ्लॉप ठरला. 'पाकिजा' प्रदर्शित झाल्यानंतर केवळ आठ महिन्यानंतर मीनाकुमारी यांची दु:खद बातमी सर्वदूर पोहोचली. तिच्या मृत्यूनंतर 'पाकिजा' ला नव्याने प्रदर्शित करण्यात आले. तिच्या मृत्यूने मात्र मृतवत 'पाकिजा' मध्ये प्राण ओतले आणि या चित्रपटाने देशात अनेक आठवडे हाऊसफुल्ल ठरून नवनवीन रेकॉर्ड नोंदविले. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक कमाल अमरोही एकदम धनाढ्य झाले.
मीनाकुमारीचे सध्याचे प्रख्यात गीतकार व दिग्दर्शक गुलजार यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. गुलजार यांना मीनाकुमारीच्या जवळपास 250 डायर्या मिळाल्या. त्यात तिच्या मनाची व्यथा मांडली आहे. बॉलीवूडची क्वीन असणारी ही अभिनेत्री वैयक्तिक आयुष्यात किती खचली होती, हे यातून कळते. या डायरीत तिने मागूनही न मिळालेले सुख, आनंद, एकांतात घालविलेले दु:खद क्षण यांचे वर्णन केले होते. जगण्यापेक्षा मरण पत्करलेले बरे असे वाटावेत असे क्षण कसे आयुष्यात आले त्याचे वर्णनही केले आहे.
गुलजार यांनी 'मीना कुमारी की शायरी' नावाने तिच्या काही शायर्या प्रकाशितही केल्या. 1980 मध्ये गुलजार हे नाव प्रस्थापित झाल्यानंतर त्यांनी 'कुछ और नज्मे' नावाने प्रकाशित केलेल्या शायरीतून तिचे नावच काढून टाकण्यात आले होते. धमेंद्र देखील एकेकाळी तिचा प्रेमी म्हणून प्रसिद्ध होता. मीना शिवाय एक क्षणही घालविणे अशक्य असणार्या धमेंद्रने या छत्तीस वर्षांच्या कालावधीत तिची चुकून साधी आठवणही काढली नाही. मीना आणि कमाल वेगळे होण्याचे कारणही धमेंद्रलाच मानले जाते.
ND
ND
या दुख:च्या बाहुलीशी सर्वांनी स्वत:चे मन रमविले. मात्र तिला मनापासून समजून घेण्याचा साधा प्रयत्नही कुणी केला नाही. प्रेमासाठी आसुसलेल्या मीनाशी प्रेमाचे दोन शब्द देखील बोलले नाही. इतकेच काय पण तिच्या मृत्यूनंतर तिच्या बंगल्याला निलामीच्या वेळीही कोणी वाचविले नाही. अभिनेत्री राखी गुलजारने प्रत्येकाचे दार ठोठावून पाहिले मात्र कोणी उलटून उत्तरही देणे गरजेचे मानले नाही.
तरीही आजही तिचा एक मोठा चाहता वर्ग आहे. टी.व्ही., सीडीच्या काळातही आजच्या पिढीची पहिली पसंत मीनाकुमारीच आहे. आणि हीच तिच्यासाठी खरी श्रद्धांजली आहे.