Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हॅपी बर्थ डे बिपाशा !

वेबदुनिया
गुरूवार, 7 जानेवारी 2010 (15:08 IST)
IFM
IFM

७ जानेवारी १९७९ रोजी नवी दिल्लीत बिपाशा बसूचा जन्म झाला. आज ती वयाची ३१ वर्षे पूर्ण करते आहे.
.............................................................................

बिपाशाला डॉक्टर व्हायचे होते. पण मॉडेलिंगच्या मार्गे ती बॉलीवूडमध्ये आली.

.............................................................................

बिपाशाला मॉडेलिंगसाठी अर्जुन रामपालची पत्नी मेहेर जेसियाने प्रोत्साहन दिले. कोलकत्यात तिने बिपाशाला पाहिले. तिच्या सौंदर्याने प्रभावित झालेल्या मेहरने तिला सौंदर्यस्पर्धेत भाग घेण्यास सांगितले. त्यात ती पहिली आली होती.
.............................................................................

अभिनय ही 'नोकरी' असल्याचे बिपाशाचे म्हणणे आहे. चित्रपटातील नायिकांची कारकिर्द अल्प असते. त्यामुळे तेवढ्या काळाचा पूर्ण फायदा घेतला पाहिजे असे तिला वाटते. लग्नानंतर ती पूर्ण वेळ कुटुंबियांसाठी देणार आहे.

.............................................................................

कुटुंब हा बिपाशाचा वीक पॉईंट आहे. विदिशा आणि विजेयता या दोन बहिणींशी तिचे खूप जवळचे संबंध आहेत. वेळ मिळेल तेव्हा ती आपल्या भाचेकंपनींशी खेळत असते.

.............................................................................

बिपाशाचे जॉन अब्राहमच्या आधी डिनो मोरियोशी अफेअर होते. पण जिस्ममध्ये काम केल्यानंतर बिपाशा व जॉन यांचे धागे जुळले.
.............................................................................

मुली जॉनवर भाळतात पण तो मात्र आपल्यावर भाळलेला आहे, ही भावना बिपाशासाठी खूप सुखद आहे.
............................................................................

सुझान व रॉकी एस हे बिपाशाचे खास दोस्त. पाश्तो हा तिचा कुत्राही तिचा अत्यंत आवडता आहे.
............................................................................

पॅरीस, न्यूयॉर्क व गोवा बिपाशाच्या आवडीची ठिकाणे आहेत. येथे सुटी साजरी करायला तिला आवडते.
.............................................................................

अजनबी हा तिचा साईन केलेला पहिला चित्रपट. यात अक्षय कुमार व बॉबी देओल हेही होते. त्यांनी केलेल्या मदतीची बिपाशाला आजही जाण आहे.
.............................................................................

बॉलीवूडमध्ये शाहरूख खान तिचा आवडता हिरो आहे. त्याची नायिका बनावी अशी तिची इच्छा आहे. पण ती अद्याप पूर्ण झालेली नाही. रब ने बना दी जोडीमध्ये एक गाणे तिने शाहरूखसोबत केले.
.............................................................................

अमिताभने एकदा म्हटले होते, की ऐतबार चित्रपटाच्या सेटवर बिपाशा जॉनची इतकी काळजी घेत होती की ते पाहून मला जॉनचा मत्सर वाटत होता.
.............................................................................

2005 व 2007 मध्ये इस्टर्न आय नावाच्या एका नियतकालिकाने आशियातील सर्वांत सेक्सी महिला म्हणून बिपाशाला निवडले होते.
.............................................................................

सावळ्या मुलीही सेक्सी आणि सुंदर असतात हे बिपाशाने दाखवून दिले.
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट मैने प्यार किया' ला 35 वर्षे पूर्ण, चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार

मल्याळम अभिनेता दिलीप शंकर हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळले

सिकंदर' चित्रपटाचा टीझर रिलीज

वरुण धवनची मुलगी लाराची पहिली झलक आली जगासमोर

सलमान खानने शेअर केले 'सिकंदर'चे पहिले पोस्टर

सर्व पहा

नवीन

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

New Year 2025 : या अद्भुत ठिकाणी नवीन वर्ष करा सेलिब्रेट

दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुंबई आणि बॉलिवूड सोडण्याचा घेतला निर्णय

Suresh Dhas Apologies Prajakta Mali अखेर सुरेश धसांनी मागितली प्राजक्ता माळींची माफी

New Year 2025 : नवीन वर्षात उदयपूर जवळील या ठिकाणांना द्या भेट