Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हॅपी बर्थ डे शाहरूख खान

वेबदुनिया
IFM
IFM
एसआरके, किंग खान आणि बॉलीवूडचा बादशहा या उपाध्यांनी उल्लेख केल्या जाणार्‍या शाहरूख खानचा आज वाढदिवस. शाहरूख आज वयाची ४४ वर्षे पूर्ण करीत आहे. अमिताभ बच्चनंतर बॉलीवूडमध्ये लोकप्रियता मिळवलेला त्याच्यासारखा दुसरा कलावंत नाही हे आज कुणीही मान्य करेल.

परदेशस्थ भारतीयांमध्ये तर तो जबरदस्त लोकप्रिय आहे. जगातील कानाकोपर्‍यात त्याचे चाहते आहेत. बॉलीवूड म्हणजे शाहरूख अशी त्याची जगात ओळख आहे.

शाहरूखसाठी मागचा काही काळ फारसा चांगला गेलेला नाही. पण तरीही त्याची लोकप्रियता मात्र कायम आहे. ओम शांती ओम, चक दे इंडिया व रब ने बना दी जोडी हे त्याचे मागचे चित्रपट चांगलेचहिट ठरले आहेत. पण अभिनयाव्यतिरिक्त त्याने इतर क्षेत्रात हात घातला तिथे मात्र त्याला अपयशच हाताला लागले.

आयपीएलमध्ये त्याच्या कोलकता नाईट रायडर्स या संघाला दारूण पराभव पहावा लागला. छोट्या पडद्यावर त्याच्या 'क्या आप पाचवी पास से तेज है?' या शो लाही यश मिळवता आले नाही. चित्रपट निर्मितीत उतरल्यानंतरही त्याचे हात पोळून निघाले. अमेरिकेत काही दिवसांपूर्वीच त्याला दुर्वतर्णुक मिळाल्याचा किस्सा गाजला. सलमान खानशी वाजल्यानंतर बॉलीवूडमधील एक गट त्याच्याविरोधात काम करतो आहे. पण तरीही शाहरूख आजही बॉलीवूडचा निर्विवाद किंग आहे.

शाहरूखने सध्या कामही कमी केले आहे. तो निवडकच चित्रपट करतो. आदित्य चोप्रा, करण जौहर आणि फराह खान यांच्याबरोबरच काम करणे तो पसंत करतो. त्यात मध्यंतरी त्याच्या खांद्याला दुखापत झाल्याने त्याच्या हालचालींवर आणि चपळाईवरही मर्यादा आल्या आहेत.

सध्या तो करण जौहरची 'माय नेम इज खान' हा चित्रपट करतो आहे. त्यात त्याच्यासोबत काजोल आहे. काजोलसोबत केलेला एकही चित्रपट आतापर्यंत फ्लॉप गेलेला नाही. याशिवाय 'रॉ-१' नावाचा चित्रपट तो करतो आहे. फराह खानचा हा चित्रपट असेल आणि तो जागतिक दर्जाचा असावा असे त्यांचे प्रयत्न आहेत.

किंग खानला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.
सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी भाग 2 च्या शूटिंगसाठी सज्ज

स्त्री 3' मध्ये अक्षय कुमारची एंट्री निश्चित झाली

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

सर्व पहा

नवीन

आता वंदे भारत ट्रेन चित्रपटात दिसणार, शूटिंगला मिळाली परवानगी

प्रसिद्ध गायक जयचंद्रन यांचे निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

51 वा वाढदिवस साजरा करत असलेला अभिनेता हृतिक रोशनने अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या

Republic Day Special नक्की भेट द्या, भारत माता मंदिर वाराणसी

लॉस एंजेलिसच्या जंगलातील आग हॉलिवूडपर्यंत पोहोचली, अनेक सेलिब्रिटींची घरे जळून खाक

Show comments