Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अनुराग कश्यपचा 'नो स्मोकींग'

वेबदुनिया
IFMIFM
' सत्या' सारख्या चित्रपटाचे कथानक लिहिणार्‍या अनुराग कश्यप यांनी आजतागायत कित्येक चित्रपटासाठी कथा, पटकथा व संवाद लेखन केले आहे. दिग्दर्शनाच्या क्षेत्रातील त्यांचा अनुभव मात्र फारसा उत्साहवर्धक राहीला नाही. त्यांनी दिग्दर्शित केलेला 'ब्लॅक फ्रायडे' कसाबसा सेंसॉरच्या कैचीतून निसटुन प्रदर्शित झाला. 'पॉच' नावाचा चित्रपटही कित्येक दिवसांपासून तयार असून तो कधी प्रदर्शित होणार याबाबत खुद्द अनुरागलाही कल्पना नाही.

दोन्ही चित्रपट खूप काळ अडकून पडल्याने अनुराग निराशेच्या गर्तेत जाऊन त्याने स्वत:कडे लक्ष देणे बंद केले होते. कित्येक लोक तणावात जास्त आहार घेतात. अनुरागचे वजनही वीस किलोंनी वाढले होते. त्याने स्वत:स सावरले व 'नो स्मोकींग' नावाचा चित्रपट हाती घेतला, तो येत्या 26 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. त्याच्यामते 'नो स्मोकींग' चेन स्मोकरच्या जीवनावर आधारीत आहे. ह्यातील पात्र खूपच जिद्दी असून सिगारेट पासून मुक्तता मिळविण्यासांठी ते झगडते आहे.

नुकताच ह्या चित्रपटाचा प्रिमियरचा खेळ ठेवण्यात आला होता. चित्रपटास सुरूवात झाल्यावर प्रेक्षकांना पहिल्यांदा काय घडतेय हेच समजत नव्हते. त्यावेळी लोकांच्या प्रतिक्रिया बघून अनुराग हसत होता. मात्र, चित्रपट संपल्यावर सर्वांनीच अनुरागचे तोंडभरून कौतुक केले. जॉन अब्राहम व रणवीर शौरीस बारा वर्षाचे मुले दाखविण्यात आलेल्या दृश्यांची खूपच चर्चा आहे. अनुरागने दोघांनाही हाफ पॅट व बनियान घालून त्या दृश्यांचे चित्रीकरण केले आहे.

अनुरागने बालाजी टेलिफिल्मच्या मालिकांचे उदाहरण देवून वीस वर्षाची व्यक्ती आजी आजोबा बनु शकते तर 24 वर्षाचा तरूण 12 वर्षाचा मुलगा का बनु शकत नाही, असा टोला हाणला. अनुराग बंडखोर स्वभावचे व्यक्तीमत्व आहे. त्याच्या कामाची शैली अगदी सरळ आहे. काही दिवसापूर्वी त्याने यशराज बॅनरअंतर्गत बनवण्यात आलेल्या चित्रपटावर टिका केली होती.

त्याच्यामते आधुनिक चित्रपट निर्मितीच्या
IFMIFM
साधनांनी सज्ज असूनही त्यांना 'झुम बराबर झुम' व 'ता रा रम पम' सारखे चित्रपट बनवावे लागतात. सध्या अनुराग शरदचंद्राच्या कादंबरीवर आधारीत 'देव डी' नावांच्या चित्रपटात व्यस्त आहे. अनुरागचा चित्रपट त्याच्या ख्यातीप्रमाणे एकदम वेगळा राहणार हे सांगण्याची आवश्यकता नाही. यामधील पात्र 'देवदास' मधीलच राहणार असले तरी त्याने कथानकात पुष्कळशे बदल केले आहेत. ह्याव्यतिरिक्त तो 'गुलाल' चित्रपटावरही काम करत आहे. मात्र, सद्यातरी त्याने आपले लक्ष 'नो स्मोकींग' वर केंद्रीत केले आहे.

दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी भाग 2 च्या शूटिंगसाठी सज्ज

स्त्री 3' मध्ये अक्षय कुमारची एंट्री निश्चित झाली

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटातील 'भसड़ मचा' या गाण्याचा धमाकेदार टीझर रिलीज

Rajmata Jijau Birthplace Sindkhed Raja राजमाता जिजाऊ जन्मस्थान, सिंदखेड राजा

कुंडली भाग्य' अभिनेत्री लग्नाच्या 5 वर्षांनंतर एका गोंडस मुलीची आई बनली

अभिनेता टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

येथे स्त्री रुपात हनुमान, जाणून घ्या कुठे आणि का प्रसिद्ध आहे हे मंदिर

Show comments