Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनीषा शांततेच्या शोधात

Webdunia
IFM
मनीषा कोईराचे डोके सध्या चांगलेच उठलेय म्हणून ती शांततेच्या शोधात आहे. त्यासाठी तिने एक योगाचा वर्ग जॉईन केला आहे. मनीषाची चित्रपट करिअर जवळपास संपल्यातच जमा आहे. बड्या बॅनरच्या चित्रपटात फारसे न दिसणार्‍या मनिषाचे बी आणि सी ग्रेडच्या चित्रपटांमध्ये अधूनमधून दर्शन होते इतकेच.

प्रेमाच्या बाबतीतही ती कमनशिबीच ठरली. तिच्या प्रियकरांची यादी कदाचित तिलाच आठवत नसे ल, एवढी मोठी होती. प्रेमात अपयशी ठरलेली मनीषा हे दु:ख विसरण्यासाठी पूर्णतः: दारूच्या आहारी गेली. त्यातही शांती न मिळाल्याने आता तिने अध्यात्म आणि योगाचा आधार घेतला आहे.

मनीषा एकेकाळी गुणवान अभिनेत्रींमध्ये गणली जायची. सुभाष घईंच्या 'सौदाग र' या चित्रपटाद्वारे करिअरची सुरुवात करुन काही चित्रपटांमध्ये चांगला अभिनयही केला. गोविंदाने तर तिची तुलना मीनाकुमारीशी केली होती.

गुणवत्ता असतानाही कामाबद्दल अतिशय बेजबाबदार असणार्‍या मनीषाला मात्र लांबचा पल्ला गाठता आला नाही. तिच्यामुळे अनेक चित्रपटांच्या शूटिंगला पर्यायाने चित्रपट प्रदर्शित व्हायला वेळ लागायचा. तिच्या वागणुकीमुळे निर्मात्यांना बराच त्रास सहन करावा लागला. विधू विनोद चोप्र ा, संजय लीला भन्साळी यासारख्या नामवंत दिग्दर्शकांनी तिच्यासोबत एकदा काम केल्यानंतर तिला आपल्या इतर चित्रपटांमध्ये न घेणेच पसंत केले. त्यामुळे कामाबद्दल व्यवहारी असणार्‍या समकालीन अभिनेत्री तिच्या कितीतरी पुढे निघून गेल्या.

मनीषाच्या 'पिण्याबाब त' अनेक गोष्टी ऐकायला मिळतात. रात्रभर जागून ड्रिंक घेऊन दुसर्‍या दिवशी शूटिंगवर उशिरा जाण े, त्यातही तिचे सुजलेले डोळे पाहून दिग्दर्शक तिच्यावर नाराज असायचे.

बड्या निर्माता-दिग्दर्शकांनी तिला घेणे बंद केल्यावर 'एक छोटी सी लव स्टोर ी', ' तु म', आणि 'चाहत :एक नश ा' यासारखे अपयशी चित्रपट तिने केले. निर्माता बनलेल्या मनिषाने 'पैसा वसू ल' करण्याऐवजी पैसा गमावला.

आता मात्र ती परत एकदा जोरदार पुनरागमन करू इच्छित आहे. पण इच्छा असली तरी स्वतःला सुधारायच्या प्रवासावर सातत्यही हवे.
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना तीन महिन्यांची शिक्षा, ४.७५ लाख रुपये दंड, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

बॉलिवूडमध्ये घबराट पसरली! कपिल शर्मा, राजपाल यादव, रेमो डिसूझा यांना धमकी, पोलिसांनी तपास सुरु केला

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवच्या वडिलांचे निधन

श्रद्धा कपूरने वडील शक्ती कपूर सोबत मुंबईत खरेदी केले घर, किंमत जाणून आश्चर्य होईल

Dyslexia या आजारामुळे अभिषेक बच्चन नीट बोलू शकत नव्हते, कारण आणि लक्षणे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

आयुष्मान खुराना बनले FICCI फ्रेम्सचा ब्रँड ॲम्बेसेडर

एल्विश यादव विरोधात गाझियाबाद न्यायालया कडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

हा महादेव आणि महाकालीचा आदेश होता, मी काही केले नाही', ममता कुलकर्णीने दिली प्रतिक्रया

प्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती आज आपला 67 वा वाढदिवस साजरा करीत आहे

पशुपतिनाथ मंदिर काठमांडू

Show comments