Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माझा कोणीच प्रतिस्पर्धी नाही- प्रीतम

Webdunia
बॉलीवूडमध्ये सध्या 'वाजत गाजत' असलेला संगीतकार अशी प्रीतमची ओळख आहे. बॉलीवूडमध्ये बंगाली संगीतकारांचे कायम वर्चस्व राहिले आहे. अगदी एसडी, आरडी बर्मन पितापुत्रांपासून अनिल विश्वास, सलील चौधरी अशी बरीच बडी नावे घेता येतील. यांचाच समर्थ वारसा आता प्रीतम सांभाळतो आहे.

IFM
बॉलीवुडमध्ये प्रीत मल ा कधीच संघर्ष करावा लागला नाही. करियरच्या सुरूवातीसच त्यांनी यश मिळवले. 'तेरे लिए' या चित्रपटातून त्यांच्या सांगितिक कारकिर्दीची सुरवात झाली. त्यानंतर यशराज बॅनरच्या 'मेरे यार की शादी है' या चित्रपटास संगीत देण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांचा गाजलेला चित्रपट म्हणजे 'धूम'. या संगीताने अक्षऱशः 'धुम' माजवली.'मेट्रो' चित्रपटाचे संगीतही लक्षात रहाण्यासारखे होते. रॉक संगीत हे प्रीतमचे खास वैशिष्ट्य. बॉलीवूडमध्ये रॉकच्या जोरावर ते राज्य करीत आहेत. यासंदर्भातच त्याच्याशी केलेली ही 'फास्ट फॉरवर्ड' बातचीत.....

प्रीतमपासून संगीतकार प्रीतम बनण्याच्या प्रवासाबाबत आम्हाला थोडे सांगा.
कॉलेजमध्ये असताना मी गिटार वाजवित असे. भविष्यात ‍चित्रपटास संगीत देईन असे त्यावेळी ध्यानीमनीही नव्हते. पण एफटीआयकडून साउंड रेकॉर्डिंगचा कोर्स करण्याची संधी मिळाली. एफटीआयमध्ये असतानाच जिंगल्स तयार केल्या. या आधारावरच संधी मिळाली आणि चित्रपट संगीताकडे वळलो.

तुमच्या यशाचे गुपित काय आहे?
माझे भाग्य आणि देवाचा आशीर्वाद

जुनी गाणी आजही लोकप्रिय आहेत. पण तुलनेत आजची गाणी अल्पायुषी ठरतात, याचे कारण काय?
आपण 2030 मध्ये गेल्यानंतर हेच बोलू. काळ बदलला आहे, आता सगळेच गतिमान झाले आहे.

हिंदी चित्रपटातील गाण्यांमध्ये बदल होत आहे. रॉकसारख्या बदलल्या संगीताचा प्रभाव किती दिवस राहिल?
बॉलीवूडमध्ये प्रत्येकवेळी नवा ट्रेंड चालत असतो. रॉक संगीत कंटाळवाणे वाटेल तेव्हा काहीतरी नवीन सं‍गीत येईल.

जन्नत, किस्मत कनेक्शनच्या यशानंतर अगामी कोणत्या चित्रपटास संगीत देत आहात?
बिल्लो बार्बर, गोलमाल रिटर्न्स, किडनॅप, हरपल तसेच इम्तियाज अली यांच्या एका चित्रपटास संगीत देत आहे.

आपण मूळ बंगाली मग बंगाली चित्रपटांनाही संगीत देता का?
निर्माता प्रदीप गुहा यांच्या एका चित्रपटासाठी मी संगीत देत आहे. या चित्रपटाचे नाव अजून निश्चित झालेले नाही.

मेट्रो चित्रपटात तुम्ही छोटीशी भूमिका केलीत. भविष्यात अभिनय करण्याचा विचार आहे का?
नाही. सध्यातरी तसा कोणताही विचार नाही.

बॉलीवुडमध्ये तुमचा प्रतिस्पर्धी संगीतकार कोण आहे?
इथे माझा कोणीच प्रतिस्पर्धी नाही. सगळेच माझे मित्र आहेत.

संगीतकार म्हणू्न आपण कतव्या क्रमांवर आहे असे आपण मानता?
शून्य

संगीतकार नसता तर कोणत्या क्षेत्रात करियर केले असते?
खेळ अर्थात फुटबॉल.

दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी भाग 2 च्या शूटिंगसाठी सज्ज

स्त्री 3' मध्ये अक्षय कुमारची एंट्री निश्चित झाली

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

अभिनेता टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

येथे स्त्री रुपात हनुमान, जाणून घ्या कुठे आणि का प्रसिद्ध आहे हे मंदिर

आता वंदे भारत ट्रेन चित्रपटात दिसणार, शूटिंगला मिळाली परवानगी

प्रसिद्ध गायक जयचंद्रन यांचे निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

51 वा वाढदिवस साजरा करत असलेला अभिनेता हृतिक रोशनने अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या

Show comments