Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लतादिदींसोबत गायची इच्छा- राधा मंगेशकर

वेबदुनिया
PR
PR
मंगेशकर घराण्यातील तिसर्‍या पीढीची गायिका म्हणून राधा मंगेशकरकडे पाहिले जाते. राधा ही पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांची कन्या. 'नाव माझं शामी' हा राधाचा नवा अल्बम नुकताच बाजारात आलाय. ह्रदयनाथ मंगेशकरांनीच त्याला संगीत दिले आहे. लतादिदींच्या हस्ते काही दिवसांपूर्वी सारेगामा या संगीत कंपनीने तो रिलीज केला. राधाच्या सुरेल प्रवासाविषयी जाणून घेऊया तिच्याच शब्दात....

' नाव माझं शामी' या पहिल्या अल्बमबद्दल काही सांग?
' नाव माझं शामी' हा माझा पहिला अल्बम माझ्यासाठी खूप खूप मोलाचा आहे. विशेष म्हणजे या अल्बमला माझे गुरु व वडिल हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिले आहे. तसेच माझा आदर्श लतादिदींच्या हस्त स्पर्शाने त्याने बाजारात पाऊल ठेवले आहे.

अल्बममध्ये कोणत्या प्रकारची गीते आहेत?
यात सहा मराठी गीते आहेत. सुधीर मोघे, बा.भ‍. बोरकर व ना.धो. महानोर यांनी ती लिहिली आहेत. सहा गीतांमध्ये एक कोळी, दोन गोव्यातील तर 'हीर' हे पंजाबी लोकगीत आहे.

यापूर्वी तू वडिलांसोबत 'स्टेज शो' करायची, त्या संदर्भात काही सांगशील?
मला बालपणापासूनच संगीताची आवड होती. मी माझ्या वडिलांकडूनच तर शास्त्रीय संगीत शिकले. ते माझी प्रेरणा आहेत. महाराष्ट्रात मी त्यांच्यासोबत बालपणापासून 'स्टेज शो' करत आलीय.

' रियालिटी शो' विषयी तुझे मत काय?
या शोच्या माध्यमातून कलावंतांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळत असतो. आपली कला सादर करण्यासाठी संधी म‍िळते. 'रियालिटी शो'च्या माध्यमातून आपल्या करीयरला ते योग्य दिशा देऊ शकतात.

शास्त्रीय संगीताकडे युवा पिढी आता फारशी वळत नाही, याविषयी तुला काय वाटते?
असे मुळीच नाही. उस्ताद राशिद खान व देवकी पंडित यासारख्या युवा गायकांनी शास्त्रीय संगीतात नाव कमावले आहे. आजही मोठ्या संख्येने तरुण- तरुणी करियर म्हणून शास्त्रीय संगीत निवडत आहे. श्रोतावर्ग कमी झाला आहे, हे मात्र मान्य करावे लागेल.

लतादिदींसोबत कधी गाणार?
लतादिदींसोबत ज्या दिवशी गाईन तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय राहील. त्यांच्यासोबत गाण्यास मीही उत्सूक आहे. बालपणापासून त्यांना ऐकत आली आहे. मात्र त्यांच्यासोबत गाऊ शकेल की, नाही याची भीती वाटते.

तुझी आवडती गायिका कोणती?
सुनिधी चौहान.

कोणत्या अभिनेत्रीला आवाज द्यायला आवडेल?
अशी कोणती स्पेसिफिक अभिनेत्री माझ्या डोळ्यासमोर नाही. सगळ्याच अभ‍िनेत्रींना आवाज द्यायला आवडेल. फक्त मी संधीच्या प्रतिक्षेत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी भाग 2 च्या शूटिंगसाठी सज्ज

स्त्री 3' मध्ये अक्षय कुमारची एंट्री निश्चित झाली

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

सर्व पहा

नवीन

आता वंदे भारत ट्रेन चित्रपटात दिसणार, शूटिंगला मिळाली परवानगी

प्रसिद्ध गायक जयचंद्रन यांचे निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

51 वा वाढदिवस साजरा करत असलेला अभिनेता हृतिक रोशनने अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या

Republic Day Special नक्की भेट द्या, भारत माता मंदिर वाराणसी

लॉस एंजेलिसच्या जंगलातील आग हॉलिवूडपर्यंत पोहोचली, अनेक सेलिब्रिटींची घरे जळून खाक

Show comments