suvichar

हॅपी बर्थ डे अजय देवगण

Webdunia
PR
अजय देवगणचा आज (ता. २) वाढदिवस. 2 एप्रिल 1969 मध्ये जन्मलेला अजय आज 39 वर्षांचा झाला असून त्याने चाळिशीत पदार्पण केले आहे. अजयने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट 'यू मी और हम' आठवडाभरात प्रदर्शित होत आहे. 'फूल और काटे' (1991) या चित्रपटातून त्याने आपले करियर सुरू केले आणि बर्‍याच चित्रपटात उल्लेखनीय अभिनय केला. त्याच्या वाढदिवशी त्याच्या पाच सर्वोत्कृष्ट चित्रपटांवर चर्चा करू या.

ओंकारा(2006)
संशय आला की सगळे काही नष्ट होते, हे शेक्सपियरच्या ऑथेल्लो या नाटकाचे सूत्र होते. तेच सूत्र घेऊन विशाल भारद्वाजने ओंकारा बनविला होता. या कल्पनेचे पूर्ण भारतीयीकरण त्याने केले. उत्तर भारतातील राजकारण आणि गुंडागर्दी या विषयावर आधारित या चित्रपटात अजयने ओंकारा नावाच्या तरुणाची भूमिका केली होती. न्यायव्यवस्था आपल्या हातात घेऊन ओंकारा स्वतःचा दबदबा निर्माण करतो. पण शेवटी संशयाच्या आधारावर तो आपल्या पत्नीची हत्या करतो आणि स्वःही आत्महत्या करतो. हा चित्रपट म्हणजे अजयच्या अभिनयाचा सुंदर नमुना आहे.

IFM
द लीजेंड ऑफ भगतसिंग(2002)
एकाच वर्षी भगतसिंगावर पाच चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यातील एक अजय देवगण अभिनित 'द लीजेंड ऑफ भगतसिंग. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला असला तरी त्यातील अजयचा अभिनय उल्लेखनीय ठरला. अजयने भगतसिंगाची आक्रमकता, देशप्रेम सुरेख आणि सूक्ष्मरितीने साकारले. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

हम दिल दे चुके सनम(1999)
सलमान खान आणि ऐश्वर्या राय या कलाकारांच्या तुलनेत अजयची भूमिका लहान होती. मात्र तरीही त्याने सलमान खानचा प्रभाव पूर्णपणे पुसून टाकत चित्रपट आपला केला. लग्नानंतरही पत्नी पूर्वाश्रमीच्या प्रियकराला विसरलेली नाही, हे लक्षात येताच तिला घेऊन तिची आणि प्रियकराची भेट घडवून आणणारा पती त्याने यात रंगवला. त्याच्या सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी ही एक आहे. या चित्रपटानंतर त्याच्या चाहत्यांच्या संख्येत चांगलीच भर पडली.

जखम (1998)
या चित्रपटाआधीच्या प्रत्येक चित्रपटात अजय फक्त मारामारी करताना नजरेस पडायचा. त्यामुळे अभिनेता म्हणून कोणीही त्याला फारसे गंभीरतेने घेत नव्हते. मात्र महेश भट दिग्दर्शित या चित्रपटातील त्याचा अभिनय पाहून हा अभिनेताही आहे, हे लक्षात आले. या चित्रपटानंतर त्याची मानसिकता बदलली आणि ऍक्शन हिरोच्या इमेजमधून त्याला मुक्ती मिळाली. त्यानंतर मात्र त्याने चांगल्याच भूमिका निवडल्या. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

इष्क (1997)
IFM
गंभीर दिसणार्‍या अजयने या चित्रपटात विनोदी भूमिका तितक्याच ताकदीनिशी साकारली आहे. तो ज्या चित्रपटाची शूटिंग करतो त्याच्या सेटवर धमाल करीत असतो. या चित्रपटातही त्याने प्रेक्षकांना हसविले. यात त्याच्या समोर आमीर खानसारखा कसलेला अभिनेता असतानाही कुठेही कमी पडला नाही. विनोदी चित्रपटात देखील उल्लेखनीय भूमिका साकारून त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे.

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

रणवीर सिंगचा 'डॉन ३' सोडण्याचा निर्णय महागात पडला; फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर FWICE ने बंदी घातली

सुशांत शेलारने विजय पाटकर यांच्यावर ५७ लाख रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

साडी खरेदीला आलेला नवरा जेव्हा म्हणतो आदिमानव खरंच सुखी

पंजाबी आणि बॉलीवूड गायक दिलजीत दोसांझ यांच्या घरावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी

Show comments