नाही जन्म नाही नाम | नाही कुणी माता पिता | प्रगटला अदभुतसा | ब्रह्मांडाचा हाच पिता || १ || नाही कुणी गुरुवर | स्वये हाच सुत्रधार | नवनाथी आदिनाथ | अनाथांचा जगन्नाथ || २ || नरदेही नरसिंह | प्रगटला तरुपोटी | नास्तिकाच्या कश्यपूला |आस्तिकाची देण्यागती || ३ ||...