पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती । सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।। हरी हर संगे ब्रम्हदेवहि, खेळे तव भाळी, पुनव हासते प्रसन्नतेने, मुख चंद्राच्या वरी। लाजवीती रवि तेजाला तव, नयनांच्या ज्योती। सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।। पुण्यप्रद तव नाम असावे, सदैव या ओठी...