Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Telangana Elections : CM केसीआर यांचा BJP वर निशाणा, म्हणाले- निवडणुकीत धडा शिकवला पाहिजे

Webdunia
Telangana Chief Minister targeted BJP : भारत राष्ट्र समिती (BRS) चे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी म्हटले की भारतीय जनता पाक्षाने  राज्यात एक देखील मेडिकल कॉलेज किंवा नवोदय विद्यालयाला मंजुरी दिलेली नाही ज्यामुळे त्यांना 30 नोव्हेंबर रोजी होणार्‍या निवडुकीत धडा शिकवला पाहिजे.
 
केसीआर या नावाने प्रसिद्ध असलेल्या राव यांनी येथे एका निवडणूक रॅलीत काँग्रेस पक्षावरही निशाणा साधला आणि ते म्हणाले की, राहुल गांधींसह त्यांचे नेते म्हणतात की ते सत्तेवर आले तर ते एकात्मिक जमीन व्यवस्थापन पोर्टल 'धरणी' काढून टाकतील ज्यामुळे पुन्हा मध्यस्थी यांचे मार्ग प्रशस्त होऊ शकतो.
 
ते म्हणाले की, बीआरएस सरकारने 10 वर्षात अल्पसंख्याक कल्याणाच्या कामांवर 12,000 कोटी रुपये खर्च केले आहेत, तर मागील काँग्रेस सरकारने 900 कोटी रुपये खर्च केले होते. प्रत्येक जिल्ह्यात नवोदय शाळा बांधण्यासाठी आम्ही केंद्राला सांगत आहोत, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. एकाही नवोदय शाळेला मान्यता मिळालेली नाही.
 
त्यांनी राज्याला एकही वैद्यकीय महाविद्यालय दिले नाही. त्यांना धडा शिकवण्याची गरज आहे, अन्यथा ते आपल्यावर मात करतील. त्यांनी लोकांना कोणत्या पक्षाचा फायदा झाला याचे मुल्यांकन करायला सांगितले आणि निवडणुकीत मतदान करण्यापूर्वी त्याचा विचार करा.
 
राव म्हणाले, काँग्रेसने या देशावर आणि राज्यावर 50 वर्षे राज्य केले. दरम्यान काही काळासाठी तेलुगुदेसम पक्षात आले. गेल्या 10 वर्षांपासून बीआरएसची सत्ता आहे. विकासाचा इतिहास तुमच्या समोर आहे. तुम्ही तथ्यांवर आधारित निर्णय घ्यावा अशी माझी इच्छा आहे.
 
त्यांनी म्हटले की जेव्हा राज्याचे गठन झाले तेव्हा पुरेशा वीज आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधेविना तो पूर्णपणे दुरवस्थेत होता. ते म्हणाले की आता देशातील तेलंगणा हे एकमेव राज्य आहे जे शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज पुरवते. केसीआर यांनी आरोप केला की काँग्रेस सरकारच्या काळात खतांचा तुटवडा होता परंतु आज ते भेसळ नसलेल्या बियाण्यांसह मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत ज्यामुळे राज्यातील कृषी क्षेत्राची प्रगती झाली आहे.
 
त्यांनी म्हटले की जातीय सलोख्यामुळे तेलंगणात गेल्या 10 वर्षांत एका दिवसासाठीही कर्फ्यू लागू करण्यात आलेला नाही. ते म्हणाले जोपर्यंत केसीआर जिवंत आहेत, तोपर्यंत तेलंगणा धर्मनिरपेक्ष राज्य राहील. बीआरएस नेत्या म्हणाले की, काँग्रेस या देशात दलितांचा व्होट बँक म्हणून वापर करते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना मिळणार मोफत उपचार, राष्ट्रपतींची मोठी घोषणा

नवनीत राणांची असदुद्दीन ओवेसी यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी, कारण जाणून घ्या

शारीरिक संबंध ठेवायचे आहेत, रेट सांगा; षंढांना घाणेरडी मागणी केल्याने बिहार पोलिसांना मारहाण !

लोकलमधील प्रवाशांची अवस्था जनावरांपेक्षाही वाईट, मुंबई हायकोर्टाची कडक टिप्पणी

मुख्यमंत्री पदाला घेऊन महायुतिमध्ये वाद वाढला, अजित पवार सह्योगीने केला दावा, एमवीए ने देखील मांडला आपला मुद्दा

सर्व पहा

नवीन

एकाच लिफ्टमधून जाताना दिसले देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे

प्रियकराला भेटण्यासाठी बाहेर पडलेल्या दोन किशोरवयीन मुलींना जीआरपीने स्टेशनवर उतरवले

'महाराष्ट्रात मनुस्मृतीला स्थान नाही', अजित पवारांचा विरोधकांच्या दाव्यावर प्रहार

जे पी नड्डा बनले राज्यसभा मध्ये सदन नेता

महाराष्ट्राच्या ऑटोमोटिव सेक्टर मध्ये होत आहे सर्वात मोठी गुंतवणूक 4000 तरुणांना मिळेल रोजगार- फडणवीसांचा दावा

पुढील लेख
Show comments