Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संसदेचे आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, उद्या अर्थसंकल्प सादर होणार

Webdunia
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास शुक्रवारपासून सुरुवात होत असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक पार पडली. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी सरकारकडून विरोधी पक्षांना करण्यात आले. नागरिकत्व विधेयक, आर्थिक मंदीसह इतर मुद्द्यांवरून सरकारची कोंडी करण्याचा निर्धार विरोधी पक्षांनी केलेला आहे.
 
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाद्वारे अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात होईल. अभिभाषणानंतर सरकारकडून संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाईल. देशाच्या आर्थिक विकासाचा लेखाजोखा आर्थिक पाहणी अहवालाद्वारे मांडला जातो. अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्‍लागार आणि त्यांचे सहकारी आर्थिक पाहणी अहवाल तयार करीत असतात. यावेळचा अहवाल मुख्य आर्थिक सल्‍लागार के. सुब्रह्मण्यम यांनी तयार केलेला आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

धनंजय मुंडेंना करुणा मुंडेंना पोटगी द्यावी लागेल, माझगाव सत्र न्यायालयाचा आदेश

LIVE: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय

नागपुरात रामनवमीसाठी वाहतूक पोलिसांनी जारी केली ऍडव्हायजरी, वाहतूक कुठे वळवणार ते जाणून घ्या

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या ताफ्याचे वाहन उलटले, तिघे जखमी

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक प्रकरण माजी अध्यक्ष हिरेन भानू आणि त्यांच्या पत्नी फरारी आरोपी म्हणून घोषित, मालमत्ता जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश

पुढील लेख
Show comments