Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रावर अन्याय करण्याची परंपरा कायम : अजित पवार

Webdunia
मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (21:16 IST)
देशाला कररुपानं सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रावर अन्याय करण्याची परंपरा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पातही कायम राखली. केंद्रानं चालू आर्थिक वर्षात एकूण 2 लाख 20 हजार कोटींचा एकूण केंद्रीय जीएसटी वसूल केला. त्यातले तब्बल 48 हजार कोटी महाराष्ट्रातून वसूल करण्यात आले. या केंद्रीय जीएसटीच्या बदल्यात महाराष्ट्राला अवघे साडेपाच हजार कोटी रुपये परत मिळाले. निधीवाटपातल्या या अन्यायाचं प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पातही स्पष्टपणे दिसत असून अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं ते शोधूनही सापडत नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटून प्रयत्न करावेत, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.
 
अजित पवार म्हणाले की, यापूर्वीच्या अर्थसंकल्पांप्रमाणे यंदाचा अर्थसंकल्पही ‘अर्थहीन’ आहे. दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन पूर्णपणे फसल्यानंतर यंदा साठ लाख नोकऱ्यांचं नवं गाजर दाखवण्यात आलं आहे. ‘एलआयसी’च्या आयपीओची घोषणा ही नफ्यातील शासकीय कंपनीच्या खासगीकरणाच्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे. हा अर्थसंकल्प पुढच्या 25 वर्षांच्या विकासाची ब्ल्यूप्रिन्ट असल्याचा दावा निरर्थक असून निवडणुका असलेल्या पाच राज्यांमधल्या जनतेची मनधरणी करण्याचा अयशस्वी प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. संरक्षणक्षेत्राला आत्मनिर्भर करण्याची घोषणा करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी गेल्या आठ वर्षात या दिशेनं केंद्र सरकारनं काय केलं याच उत्तर आता तरी द्यावं. ‘मेक इन् इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ या घोषणांप्रमाणे यंदाच्या अर्थसंकल्पातील घोषणाही हवेत विरुन जातील, असं दिसतं.
 

संबंधित माहिती

मुंबईत पक्ष्यांच्या कळपावर विमानाची धडक लागून 40 फ्लेमिंगोचा मृत्यू

परळी मध्ये उष्माघाताने भाजीविक्रेताचा मृत्यू

SRH vs KKR : कोलकाता आणि हैदराबाद अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या इराद्याने समोर येणार

सोलापुरात घरगुती वादाला कंटाळून महिलेने तलावात उडी घेतली, लोकांनी वाचवले तिचे प्राण

धोनी लंडनला जाऊन उपचार घेणार, नंतर निवृत्तीचा विचार करणार!

छपरामध्ये मतदानानंतर तरुणाची हत्या, 2 जणांना अटक

सोशल मीडिया बनला जीवघेणा शत्रू , ट्रोलिंगने घेतला आईचा जीव

भगवान जगन्नाथांशी जोडलेल्या टीकेवर संबित पात्राने मागितली माफी, म्हणाले-प्रायश्चित्तासाठी ठेवेल 3 दिवस उपास

नोएडा मध्ये शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कारने दिली धडक, एका विद्यार्थ्यांचा मृत्यू

भाजप आमदाराच्या नातवाची आत्महत्या

पुढील लेख
Show comments