Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

500 रुपयांच्या बनावट नोटा अशा ओळखा...

Webdunia
नोटबंदीनंतर बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट वाढला असून, सर्वाधिक बनावट नोटा या 500 रुपयांच्या असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालाद्वारे पुढे आली आहे.
 
आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलंय की, मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2022-23 या वर्षात 500 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 14.4 टक्क्यांनी वाढली आहे.
 
आपल्या वार्षिक अहवालात आरबीआयने म्हटलंय की, या आर्थिक वर्षात 500 रुपयांच्या 91,110 बनावट नोटा बँकिंग व्यवहारादरम्यान जप्त करण्यात आल्या आहेत.
 
2021-22 मध्ये 79,669 नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.
 
500 रुपयांच्या नोटांसोबतच 20 रुपयांच्याही बनावट नोटा वाढू लागल्याचं आरबीआयच्या वार्षिक अहवालात म्हटलंय.
 
शिवाय 2000 रुपयांच्या 9,806 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
 
अलीकडेच आरबीआयने 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनातून बाद केल्या आहेत.
 
आरबीआयने म्हटलंय की, तुम्ही या नोटा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बदलू किंवा जमा करू शकता. पण सप्टेंबरनंतरही या नोटा कायदेशीर राहतील.
 
2022-23 या आर्थिक वर्षात बँकिंग क्षेत्रात एकूण 2,25,769 बनावट नोटा सापडल्या. त्यापैकी 4.6 टक्के आरबीआयमध्ये आणि 95.4 टक्के इतर बँकांमध्ये आढळून आल्याचं अहवालात म्हटलंय.
 
दरम्यान 31 मार्च 2022 पर्यंत चलनात असलेल्या एकूण नोटांच्या मूल्यापैकी 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचा वाटा 87.1 टक्के होता. सरत्या आर्थिक वर्षात 500 रुपयांच्या नोटांचा वाटा सर्वाधिक होता. 500 रुपयांच्या 25,81,690 कोटी रुपयांच्या नोटा सध्या चलनात आहेत.
 
500 रुपयांच्या या बनावट नोटा चलनात असल्याने लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
 
पण या 500 रुपयांच्या बनावट नोटा ओळखायच्या कशा? 2016 मध्ये झालेल्या नोटाबंदीमुळे खोट्या नोटांची समस्या का सुटली नाही?
 
500 रुपयांची नवी नोट कधी आली?
केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी मोठ्या चलनी नोटा चलनातून बाद केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा करत 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा अवैध ठरवल्या.
 
जुन्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 500 रुपयांच्या नोटा नव्या डिझाईनमध्ये आणल्या. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नोटेत बदल करण्यात आले होते.
 
या नव्या नोटांचा रंग, आकार, सुरक्षा वैशिष्ट्ये आणि आकृतिबंध आधीच्या नोटांपेक्षा खूप वेगळा आहे.
 
दगडी राखाडी रंगाची ही नवी नोट 66 मिमी x 150 मिमी आकाराची आहे.
 
आरबीआयच्या अहवालात असं म्हटलंय की, 500 रुपयांच्या नोटांमध्ये अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्य देऊनही बनावट नोटा चलनात वाढत आहेत.
 
नोटाबंदीने काय साध्य झालं?
8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केली. याअंतर्गत 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा म्हणजेच 86 टक्के चलन बाद करण्यात आलं.
 
या नोटाबंदीनंतर लोकांनी आपल्या जवळच्या मोठ्या रकमेच्या नोटा बदलण्याचा प्रयत्न केला.
 
अर्थव्यवस्थेतील बनावट नोटा हद्दपार करण्यासाठी नोटाबंदी करण्यात आल्याचं केंद्र सरकारने म्हटलं होतं.
 
शिवाय भ्रष्टाचार, काळया पैशावर अंकुश ठेवणे, बनावट नोटा हद्दपार करणे आणि दहशतवादाला मिळणारा निधी रोखणे हा नोटबंदीचा मुख्य हेतू असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं होतं.
 
पण नोटाबंदी करूनही सरकारचा उद्देश सफल झाल्याचं दिसत नाही.
 
कारण आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलंय की, या आर्थिक वर्षात 500 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 14.4 टक्क्यांनी वाढली आहे.
 
500 रुपयांची बनावट नोट कशी ओळखाल?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी लोकांना 500 रुपयांच्या बनावट नोटा कशा ओळखायच्या याची माहिती देते.
 
'द इकॉनॉमिक टाईम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार आरबीआयने म्हटलंय की, चलनात असलेल्या सर्व नोटांसाठी महात्मा गांधींची नवी मालिका आहे.
 
या नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरची स्वाक्षरी आहे. नोटेवर मागच्या बाजूला ठसठशीत आकारात भारतीय वारसा सांगणारी वास्तू लाल किल्ला छापलेला आहे.
 
या नोटेचा मूळ रंग दगडी राखाडी आहे
 
500 रुपयांच्या नोटेमध्ये तुम्हाला खालील गोष्टी तपासाव्या लागतील
 
नोटेवर पुढच्या बाजूला प्रकाश आरपार जाऊ शकेल असा छोटा भाग आहे. ज्या मूल्याची नोट आहे ते मूल्य आकड्यात लिहिल्यावर तयार होणाऱ्या आकाराचा हा पारदर्शी भाग आहे.
 
नोटेच्या पुढच्या बाजूवर देवनागरी भाषेत तिचं 500 हे मूल्य लिहिलेलं आहे.
 
नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधींची प्रतिमा आहे.
 
गांधीजींचं चित्र असलेल्या ठिकाणी देवनागरीतील लहान अक्षरात भारत लिहिलं आहे.
 
भारतीय नोटांमध्ये ती खरी आहे हे कळावं म्हणून आणि तिचं मूल्य राखलं जावं म्हणून मध्ये चांदीचा एक धागा असतो. या सुरक्षा धाग्यावर 'भारत' आणि आरबीआय असे शब्द लिहिले आहेत.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments