Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Credit card पहिल्यांदाच बँकेचे क्रेडिट कार्ड घेतले आहे. ते कसे वापरावे याबाबत मार्गदर्शन

Webdunia
गुरूवार, 10 ऑगस्ट 2023 (17:12 IST)
Credit card from the bank for the first time क्रेडिट कार्ड वापरताना आपणाला सामान्यतः 40 ते 50 दिवसानपर्यत व्याज मुक्त कालावधी दिला जातो। आपण आपल्या महिन्याच्या विहित कालावधीत केलेले खर्च मदतीपासून 15 दिवसांचे आत भरल्यास कोणतेही व्याज लागत नाही। इतरांनी नमूद केल्यानुसार क्रेडिट कार्डावर अनेक सवलती आणि कॅशबॅक मिळत असल्याने आपल्या क्रेडिट कार्डवरील छुपे चार्जेस वगळून देखील तुम्हाला या मुदतीत पैसे बिनव्याजी वापरायला मिळू शकतात। हा नियम फक्त खरेदीसाठी लागू होतो। खरेदीमध्ये फोन बिल, लाईट बिल, सरकारी बिले, पेट्रोल, दवाखाना, दुकानातील खरेदी तसेच ऑनलाइन खरेदी यांचा समावेश होतो। आपण योग्य दुकानाची निवड केल्यास आपल्याला रोख रक्कमेचा वापर कार्डच्या माध्यमातून खूप कमी करता येऊ शकतो।
 
या काळात तुमचा पगार बचत खात्यात शिल्लक असेल तर त्यावर काही प्रमाणात तुम्हाला व्याज मिळू शकते। तसेच महिनाअखेरीस विहित मुदतीत आपण क्रेडिट कार्डची सर्व रक्कम अदा केल्यास त्यावर कोणतेही व्याज लागत नाही। यामुळे आपण दुहेरी फायदा घेऊ शकता। हा दुहेरी फायदा घेण्यासाठी स्वयं शिस्त खूप आवश्यक आहे। आपला क्रेडिट कार्डचा एकूण वापर आपल्या मासिक पगाराच्या मर्यादेत ठेवणे आवश्यक आहे। यापेक्षा जास्त खरेदी केल्यास अतिरिक्त व्याज देण्याचा तोटाही होतो।
 
क्रेडिट कार्ड वापरताना अत्यावश्यक असल्याशिवाय कधीही कार्डवरून रोख रक्कम काढू नये। रोख रक्कमेवर पैसे घेतलेल्या दिवसापासून व्याज सुरू होते आणि हा व्याजदर खुप जास्त (सहसा वर्षाला ३५-४०% किंवा क्वचित यापेक्षाही जास्त) असू शकतो। रोख रक्कमेवर कोणताही व्याज मुक्त कालावधी नसतो। याशिवाय रोख रक्कम हाताळणीच्या नावाखाली अतिरिक्त चार्जेस लावले जातात ते वेगळे!
 
जर एखाद्या महिन्यात आपल्याला क्रेडीट कार्डाची वापरलेली पूर्ण रक्कम भरने शक्य नसल्यास किमाण रक्कम वेळेत भरल्यास अतिरिक्त दंड लागत नाहीत। फक्त व्याज लागू होईल। जी रक्कम वापरली आहे त्यावर खर्च केलेल्या दिनांकापासून रक्कम चुकती करेपर्यंत महिना २ ते ३.५ % व्याज लागते। हे व्याज प्रति दिवस मोजले जात असल्याने पैसे भरण्याच्या अंतिम दिनाकाची वाट न पाहता लवकरात लवकर भरणे नेहमी श्रेयस्कर असते।
 
: क्रेडिट कार्ड लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आजकाल प्रत्येकजण त्याचा वापर करत आहे. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यार्थी क्रेडिट कार्ड सुविधाही उपलब्ध आहे. क्रेडीट कार्डचा वापर योग्य आणि चतुराईने झाला तर ते फायदेशीर ठरते. जर तुम्ही त्याचा स्वैर वापर केलात तर तुम्ही नेहमीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले राहाल. क्रेडिट कार्ड व्यवहार करणे म्हणजे उद्याची कमाई आज खर्च करण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत आर्थिक व्यवस्थापनासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
 
याशिवाय, मोठी खरेदी करताना खरेदी EMI पद्धतीने / हप्त्याने पैसे भरण्याच्या अटीवर खरेदी केल्यास व्याजदर कमी (१२ ते १८% वार्षिक) होऊ शकतो। मोठी खरेदी EMI मध्ये परावर्तित करण्याची मुदत जाणून बँकेला फोन करून अथवा मोबाईल एपवरून या योजनांचा लाभ घेऊ शकता। अनेक वेळा यामध्येही तुम्हाला व्याजमुक्त 3 ते 6 हप्त्यात पैसे भरण्याची संधी मिळू शकते।
 
क्रेडिट कार्डचा वापर तुम्हाला तुमचे सीबील स्कोर वाढविण्यासाठी मदत करते। परंतु कार्डाची रक्कम वेळेत न भरल्यास तुमचा क्रेडिट स्कोर खूप पटकन खराब होऊ शकतो। कार्डच्या एकूण मर्यादेपेक्षा 50% पेक्षा जास्त खर्च मर्यादा कधीही ओलांडू नये। याचा परिणाम आपल्या सीबील क्रेडिट स्कोरवर होऊ शकतो।
 
तुमच्याकडे 2-3 क्रेडिट कार्ड असतील तर तुम्ही वेगवेगळ्या बँकांच्या ऑफरचा फायदा घेऊ शकता। याशिवाय 1 पेक्षा जास्त कार्ड असल्यास आपण प्रत्येक कार्डचा वापर 20 ते 30% मर्यादेपर्यत ठेवू शकाल। परंतु 3 पेक्षा जास्त कार्ड असणे धोकादायक ठरू शकते। प्रत्येक कार्डची पैसे भरण्याची दिनांक आणि त्यावरील योजना यामध्ये गफलत होण्याची शक्यता नाकारू शकत नाही।

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

5 कोटींच्या आरोपावरून विनोद तावडेंवर कारवाई, राहुल-खर्गे यांना पाठवली 100 कोटींची नोटीस

20 हजारांच्या फरकाने विजयाचा दावा करत आहेत शिवसेना नेते मुरजी पटेल

LIVE: नागपुरात भाजप नेते देवेंद्र फडणवीस पुढे

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

लोकल ट्रेनमध्ये सीटवरून वाद झाला, दुसऱ्या दिवशी अल्पवयीनने खून करून बदला घेतला

पुढील लेख
Show comments