rashifal-2026

आधार-पॅन लिंक केले का, शेवटची मुदत कधी आहे, दंड किती भरावा लागेल- वाचा

Webdunia
मंगळवार, 28 मार्च 2023 (11:23 IST)
आता या पुढच्या सगळ्या ऑनलाईन बँकिंग किंवा इतर आर्थिक व्यवहारांसाठी पुढील माहिती महत्त्वाची आहे. म्हणूनच आज जाणून घेऊया पॅन आधारशी कसं जोडायचं, का जोडायचं आणि नाही जोडलं तर काय होईल?
पॅन आणि आधार म्हणजे काय हे सुरुवातीला समजून घेऊया… पॅन म्हणजे पर्मनंट अकाऊंट नंबर.
 
आकडे आणि अक्षरं यांचं मिश्रण असलेला हा दहा डिजिट नंबर आहे. आयकर विवरणपत्र भरण्यासाठी पॅन अनिवार्य आहे आणि आयकर विभागच तुम्हाला पॅन नंबर आणि लॅमिनेटेड ओळखपत्र देत असतं.
 
बँकेत खातं उघडताना आणि जवळ जवळ सगळ्याच आर्थिक व्यवहारांच्या वेळी पॅन क्रमांक लागतो. आणि त्याच्या मदतीने आयकर विभागही तुम्ही करत असलेल्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवत असतो.
 
मोठे गैरव्यवहार टाळण्यासाठी सरकारला याचा उपयोग होतो. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ही केंद्रसरकारची एक संस्था आहे. आणि ते आधार ओळखपत्र तुम्हाला देतात. हा एक बारा आकडी क्रमांक आहे जो प्रत्येक नागरिकासाठी वेगळा आहे.
 
तुमचं नाव, जन्मदिवस, वय, लिंग, निवासाचा पत्ता आणि बरोबरीने तुमच्या बोटाचे ठसे आणि डोळ्यांचं बायोमेट्रिक स्कॅन घेऊन तुम्हाला आधार क्रमांक दिला जातो.
 
प्रत्येक नागरिकाकडे एक युनिक असं एकच ओळखपत्र असावं आणि हळुहळू रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र आणि शक्य झालं तर वाहन चालवण्याचा परवानाही आधारशी जोडून वेगवेगळी ओळखपत्र बाळगण्याच्या झंझटीतून लोकांची सुटका व्हावी यासाठी केंद्राचा हा प्रयत्न आहे.
 
विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार अनिवार्य आहे. तर अशी ही दोन अतिशय महत्त्वाची सरकारी ओळखपत्र आहेत. 31 मार्च 2023 हा आधार आणि पॅन जोडण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यासाठी 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे.
 
पॅन कार्ड आधारशी का जोडायचं?
ठरलेल्या मुदतीत तुम्ही पॅन कार्ड नाही जोडलंत आधारशी तर काय होईल? तुमचं पॅन कार्ड रद्द होईल.
 
आणि एकतर आयकर कायदा 272B नुसार तुम्हाला दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो आणि दुसरं म्हणजे पॅन कार्ड नसताना तुम्ही जवळ जवळ कुठलेच मोठे आर्थिक व्यवहार करू शकणार नाही.
 
50 हजारांच्या पुढच्या रोख व्यवहारांसाठीही हल्ली पॅन अनिवार्य आहे.
 
आधार पॅन जोडलेले आहे की नाही कसं ओळखायचं?
पॅन आणि आधार एकमकेांशी जोडलेले आहेत का हे तपासण्यासाठी आयकर विभागाच्या साईटवर जाऊन ‘To view status if you already submitted link Aadhaar status’ वर क्लिक करावे. यासाठी https://www.utiitsl.com/ किंवा https://www.proteantech.in/ यांचा वापर करू शकता.
 
तिथं आपला पॅन आणि आधार नंबर टाकायचा.
 
‘View Link Aadhaar Status’ वर क्लिक करा. तिथं आधार आणि पॅन लिंक आहे की नाही समजेल.
 
आधार आणि पॅन लिंक आहे का हे एसएमएसद्वारे समजण्यासाठी
"UIDPAN <12 digit Aadhaar number> <10 digit PAN number>" या फॉरमॅटमध्ये 567678 किंवा 56161 ला मेसेज करा. तुम्हाला त्याचं उत्तर एसएमएसद्वारे समजेल.
 
आधार आणि पॅन ऑनलाइन जोडण्यासाठी
आयकर विभागाच्या https://www.incometax.gov.in/iec/foportal/ संकेतस्थळावर गेल्यावर क्विक लिंक्स विभागात लिंक आधारवर क्लिक करावे,
तिथं एक फॉर्म दिसेल, त्यात आधार आणि पॅन नंबर टाका.
तेथे Continue to Pay Through e-Pay Tax वर क्लिक करा.
तेथे पॅन नंबर टाकून कन्फर्म करा, त्याचा तुम्हाला ओटीपी येईल
ओटीपी व्हेरिफाय केल्यावर तुम्ही e-Pay Tax page वर जाल.
तेथे प्रोसिड बटणावर क्लिक करा.
त्यानंतर Assessment Year 2023-24 निवडून पेमेंटसाठी "Other Receipts" निवडा.
पैसे भरल्यावर पुन्हा एकदा इ फायलिंग पोर्टल वर जा.
तेथे तुमचा युजर आयडी, पासवर्ड टाकून आत प्रवेश करा,
तेथे लिंक आधार नावाची विंडो पॉप अप होईल. तसं न झाल्यास प्रोफाइल सेटिंग्स मध्ये जाऊन लिंक आधारवर क्लिक करा,
तिथं तुमचं नाव, जन्मतारीख, लिंग ही माहिती तुमच्या पॅनमधून आपोआप घेतल्याचं दिसेल.
आधार आणि पॅनची माहिती जुळत असल्यास "link now" वर क्लिक करा.
मग हे दोन्ही जोडल्याचा मेसेज पॉपअप होईल.
31 मार्च 2023 हा आधार आणि पॅन जोडण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यासाठी 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे.
 
Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

भीषण अपघात; कारवर डंपर उलटल्याने एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू

पृथ्वी शॉने मैदान गाजवले

LIVE: निवडणुकांसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर

मराठी साहित्यविश्वात शोककळा

निवडणुकांसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर

पुढील लेख