suvichar

LIC एजंट कसे बनायचे जाणून घ्या

Webdunia
शनिवार, 13 मार्च 2021 (17:57 IST)
एलआयसी ऑफ इंडिया (लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) विमा कंपनी आपल्या एजंटला लोकांपर्यंत आपला व्यवसाय वाढविण्यासाठी विमा योजना पोहोचविण्यास मदत करते , हे एजंट कंपनी आणि ग्राहक यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करतात आपण अर्धवेळ किंवा पूर्ण वेळ काम करू शकता. आपली एजंट म्हणून काम करायची इच्छा असल्यास, एलआयसीमध्ये एजंट म्हणून काम करून आपले उत्पन्न वाढवू शकता. आपण एलआयसी एजेंट कसे बनू शकता हे जाणून घेऊ या. 
 
भारतीय आयुर्विमा महामंडळ गेले  अनेक वर्षे लोकांची सेवा करत आहे. ही संस्था विश्वसनीय आहे. आपण या संस्थेत पूर्ण किंवा अर्धा वेळ सहभागी होऊ शकतात. एलआयसी एजंट होण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन अर्ज करावा लागेल, या साठी अर्जदाराने जवळच्या एलआयसीच्या शाखा कार्यालयात संपर्क साधावा . आणि तिथल्या विकास अधिकाऱ्याला भेटावे .  
आपण पात्र असाल तर आपल्याला परीक्षण देण्यात येईल. या मध्ये विमा व्यवसायाची संपूर्ण माहिती अर्जदाराला पुरविली जाते.प्रशिक्षण झाल्यावर चाचणी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. नंतर एजंट म्हणून नेमणूक केली जाते. 
 
एजंट होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे- 
* पासपोर्ट आकाराचे सहा फोटो.
* दहावी आणि बारावीच्या प्रमाण पत्राची छायाप्रत .
* पॅनकार्ड.
* रहिवासी प्रमाण पत्र, मतदार ओळखपत्र , आधारकार्ड.  
 
एलआयसी एजंट होण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा- 
या साठी अर्जदाराने एलआयसी च्या संकेत स्थळावर https://agencycareer.licindia.in/agt_req/ जाऊन भेट द्यावी आणि ऑनलाईन नोंदणी करावी. या नंतर एलआयसी कडून मेल किंवा ईमेल येत, या मध्ये आपल्याला पुढील प्रक्रिया आणि नियमांना सांगितले जाते.अधिक माहिती साठी आपल्याला नजीकच्या एलआयसी कार्यालयात जाऊन संपर्क करून माहिती मिळवावी लागेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, एमपीएससी परीक्षा सुलभ होणार

Vaibhav Suryavanshi's India Debut वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता

पुण्यात तीव्र उष्णतेच्या लाटेने हाहाकार माजवला, हवामान विभागा कडून यलो अलर्ट जारी

Who is Praful Hinge: IPL 2026 मध्ये मराठमोळ्या खेळाडूची कमाल; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव प्रफुल हिंगे कोण आहे?

Asian Wrestling Championships:अमन आणि मुकुल दहिया यांनी रौप्य पदक जिंकले, भारताने एकूण १७ पदके जिंकली

पुढील लेख
Show comments