Festival Posters

महात्मा फुले जनआरोग्य योजनेची जनजागृती

Webdunia
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020 (12:26 IST)
करोना महामारीला तोंड देत असतांना रुग्णावर होणारा खर्च कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन महात्मा फुले (Mahatma Phule) जन आरोग्य योजनेची जनजागृती करत आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
 
या योजनेबाबत नागरिकांमध्ये असलेला संभ्रम दूर होण्यासाठी दृकश्राव्य माध्यमातून त्यांनी माहिती दिली. राज्य शासनाच्या निर्णयानुसार महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये करोना आजाराचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिक या योजनेसाठी पात्र आहे. जिल्ह्यत सहा शासकीय रुग्णालयांसह एकूण २७ रुग्णालये या योजनेशी संलग्न आहेत. नागरिकांनी आपल्याला या योजनेची मदत लागणार नाही यासाठी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे.
 
परंतु, करोनाची बाधा झाल्यास वेळीच रुग्णालयात पोहचून उपचार सुरू करावेत. त्यासोबतच किमान कागदपत्रे ज्यामध्ये आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत ठेवून रुग्णालयाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट करण्याबाबत प्रक्रिया करण्यास सांगावे तसेच याबाबत दूरध्वनीवरून माहिती देण्याचीदेखील सुविधा उपलब्ध आहे. त्याचा वापर करण्यास रुग्णालय प्रशासनास सांगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले.  या योजनेसाठी यापूर्वीच उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी यांची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी रुग्णांना मदत करत असल्याची ते वेळोवेळी खातरजमा करत आहेत. या योजनेसाठी पंकज दाभाडे यांची समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे. नागरिकांनी या योजनेबाबत काही अडचणी असल्यास दाभाडे यांच्याशी ९४०४५ ९४१६१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मांढरे यांनी केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

पाकिस्तान आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

Legislative Council elections भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

महाराष्ट्र सरकारने १,००० गावांमध्ये एआय प्रणाली लागू करून मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले

धक्कादायक : धुळे येथे रुग्णवाहिकाचा वापर करून गोवंशाची तस्करी करण्याचा प्रयत्न

पुढील लेख
Show comments