Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रेशन कार्ड नंबर ऑनलाईन या प्रकारे बघता येईल

Webdunia
गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (15:06 IST)
रेशन कार्ड नंबर ऑनलाईन बघण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला mahafood.gov.in वर जावं लागेल.
नंतर महाराष्ट्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची वेबसाईट ओपन होईल.
या वेबसाईटवर उजवीकडील ऑनलाईन सेवा येथे सगळ्यात शेवटी असलेल्या ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली या पर्यायावर क्लिक करावं लागेल.
नंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल. 
या पेजवरील उजवीकडील मराठी या पर्यायावर क्लिक केलं तर मराठीत माहिती दिसून येईल.
नंतर वरच्या बाजूच्या साईन इन किंवा रेजिस्टर या रकान्यातील सार्वजनिक लॉग इन या पर्यायावर क्लिक करावं लागेल.
नंतर तुम्हाला लॉग इन डिटेल्स टाकाव्या लागतील.
इथं तुम्ही भाषा इंग्लिश किंवा पर्यायवर क्लिक करुन मराठीत पुढे चालू ठेऊ शकता.
नंतर खाली दोन पर्याय दिसतील, एक म्हणजे नोंदणीकृत युझर आणि दुसरा नवीन युझर. 
आपण पहिल्यांदाच या साईटवर येत असल्यानं आपल्याला नवीन युझर या पर्यायावर क्लिक करावं लागेल.
नंतर एक नवीन पेज उघडेल. 
इथं Do you have ration card आणि No ration card असे दोन पर्याय दिसतील.
यातल्या No ration card या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावं लागेल.
येथे आधारवर जे नाव जसं आहे तसंच लिहायचं आहे. 
नंतर आधार नंबर, मोबाईल नंबर टाकावा लागेल. 
मेल आयडी असल्यास भरावा लागले.
नंतर आधार कार्डवरील जन्मतारीख टाकावी. 
नंतर लिंग निवडावं आणि सगळ्यात शेवटी कॅप्चा टाकावा लागेल.
ही माहिती भरल्यावर Verify Aadhar या पर्यायावर क्लिक करावं लागेल.
आता जर आपण मोबाईल वर पाहत असाल तर तुम्हाला स्क्रीनवर सगळ्यात वर लाल अक्षरात एक मेसेज दिसेल. पण जर सिस्टमवर पाहत असाल तर Verify Aadhar या पर्यायावर क्लिक केल्यावर आधी उजव्या कोपऱ्यामध्ये येऊन झूमचं प्रमाण कमी टक्क्यांवर आणल्यावर तुम्हाला लाल अक्षरातला मेसेज दिसेल.
Aadhar card Already exist for another RC. Details are as follows-District Name: ........ 
असा हा मेसेज असेल.
याचा अर्थ तुमचं आधार कार्ड रेशन कार्डला आधीपासून लिंक केलेलं आहे. 
पुढे तुमचा जिल्हा, गावाचं नाव आणि आरसी आयडी म्हणजे बारा अंकी रेशन कार्ड नंबर दिलेला असेल.
आता एकदा आरसी नंबर मिळाला की तुम्ही तुमचं रेशन कार्डही ऑनलाईन पाहू शकता.
त्यासाठी तुम्हाला rcms.mahafood.gov.in यावर जायचे आहे.
नंतर एक नवीन पेज उघडेल. यावरील उजवीकडील Ration Card या पर्यायाखालील Know your ration card यावर क्लिक करायचे आहे.
नंतर तुम्हाला कॅप्चा टाकून Verify या बटनावर क्लिक करायचे आहे. 
नंतर रेशन कार्ड नंबर टाकून आपण ऑनलाईन जो रेशन कार्ड नंबर पाहिला तो इथं टाकायचा आहे. 
यानंतर view report वर क्लिक करायचे आहे.
नंतर आपल्यासमोर रेशन कार्डसंबंधित माहिती उघडेल.
स्क्रीनवर सुरुवातीला रेशन कार्ड नंबर आणि मग त्यापुढे Print Your Ration Card असा पर्याय दिसेल.
यावर क्लिक केल्यास रेशन कार्ड उघडेल. 
यावर रेशन कार्ड नंबर, कुटुंब प्रमुखाचं नाव आणि पत्ता, रेशन दुकानदाराचा नंबर-नाव-पत्ता, कुटुंबातील सदस्यांची माहिती, तसंच तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत धान्य मिळतं आणि ते किती मिळायला हवं, याची माहिती मिळेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार, शिवसेना-राष्ट्रवादीच्या या नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली

फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, मंत्र्यांचा शपथविधी सुरू

LIVE: नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी सुरू

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिवसेनेत असंतोष, उपनेते नरेंद्र भोंडेकर यांचा राजीनामा

मोठी बातमी, शपथ घेणारे मंत्री केवळ अडीच वर्षेच पदावर राहणार शिंदे आणि पवार गटाची घोषणा

पुढील लेख