Marathi Biodata Maker

कामाची गोष्ट : परदेशात जाण्याचा विचार करीत असाल तर पासपोर्टला लसी प्रमाणपत्राशी जोडण्याची प्रक्रिया जाणून घ्या

Webdunia
शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (15:32 IST)
कोविड -19  च्या प्रकरणांमध्ये घट झाली आहे.हे लक्षात घेता,आता जगातील बहुतेक देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आपल्या येथे येण्यास परवानगी देणे सुरू केले आहे.तथापि, कोविड महामारीनंतर, प्रवासाशी संबंधित नियमांमध्येही बरेच बदल दिसून आले आहेत.या नियमांपैकी एक म्हणजे आपला पासपोर्ट कोरोना लस प्रमाणपत्राशी जोडणे. कोविड -19 मार्गदर्शक तत्त्वांनुसार अनेक देशांनी हा नियम अनिवार्य केला आहे.जर आपण देखील परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर जाण्याच्या आधी आपला पासपोर्ट कोरोना लसीच्या प्रमाणपत्राशी जोडा. 
कोविड -19  लसीकरणाबाबतच्या नवीन मार्गदर्शक तत्वांमध्ये असलेले हे केंद्र सरकारने अनिवार्य केले आहे. परदेशात जाण्यासाठी, कोविड -19 लसीकरण प्रमाणपत्र पासपोर्टशी जोडणे बंधनकारक असेल.जर आपल्याला देखील अभ्यासाच्या किंवा नोकरीच्या संबंधात परदेशात जायचे असेल तर आपल्याला हे करणे आवश्यक आहे.आपण कोविन(cowin) पोर्टल ला भेट देऊन आपला पासपोर्ट कोविड -19 लसीकरण प्रमाणपत्राशी जोडू शकता.चला तर मग कोविड -19 लसीकरण प्रमाणपत्र पासपोर्ट शी जोडण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊ या. 
 
कोविड -19 लसीकरण प्रमाणपत्र पासपोर्टशी जोडण्याची प्रक्रिया 
 
* सर्व प्रथम, आपण Covin च्या अधिकृत वेबसाइट, cowin.gov.in वर जा.
 
* ओटीपी द्वारे लॉग इन केल्यानंतर, आपल्याला येथे Raise an issueच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 
* यानंतर Add Passport details to my vaccination certificate  वर क्लिक करा. 
 
* येथे आपण सूचीमधून प्रवास करणारी व्यक्ती निवडा.
 
* यानंतर आपल्याला नाव आणि पासपोर्ट नंबर सारखे सर्व तपशील सबमिट करावे लागतील.
 
* सर्व तपशील भरल्यानंतर, आपल्याला खालील बॉक्सवर टिक करावी लागेल, ज्यात हे घोषित केले जाईल की हा पासपोर्ट संबंधित व्यक्तीचा आहे.
 
* त्यानंतर तुम्ही सबमिट रिक्वेस्टच्या बटणावर क्लिक करा. तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर एक संदेश येईल. 
 
* पुढे, CoWIN अॅपवर आपल्या खात्याच्या तपशीलांवर जा, येथे प्रमाणपत्र बटणावर क्लिक करा आणि पासपोर्टशी जोडलेले आपले नवीन लस प्रमाणपत्र डाउनलोड करा
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

"मला मुख्यमंत्र्यांची दया येते," उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला

LIVE: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर मंत्रिमंडळातील "भ्रष्ट" सहकाऱ्यांना संरक्षण देण्याचा आरोप केला

पैसे दुप्पट करण्यासाठी तीन जणांनी जीव गमावला! तांत्रिक विधीदरम्यान झालेल्या गूढ मृत्यूंमुळे खळबळ

नाशिकमध्ये भीषण आग! दुकाने जळून खाक

अमित शाह आणि मोहन भागवत अंदमान आणि निकोबारला भेट देणार, सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण होणार

पुढील लेख
Show comments