Marathi Biodata Maker

Rose Day 2026 Wishes in Marathi 'रोज डे' च्या शुभेच्छा

Webdunia
शनिवार, 7 फेब्रुवारी 2026 (06:40 IST)
प्रियकर/प्रेयसीसाठी (For Boyfriend/Girlfriend)
तुझ्या आयुष्यात गुलाबासारखा सुगंध सदैव दरवळत राहो 
आणि तुझे आयुष्य फुलासारखे बहरत राहो
हॅप्पी रोझ डे!
 
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गुलाबाला, 
ज्याने माझे जग प्रेमाने भरून टाकले आहे
तुला रोझ डेच्या खूप खूप शुभेच्छा!
 
हे गुलाबाचं फूल फक्त एक भेट नाही, 
तर ते माझ्या प्रेमाची कबुली आहे
तू माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर फूल आहेस
 
ज्याप्रमाणे गुलाबाशिवाय बाग अपूर्ण आहे, 
त्याप्रमाणे तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे
Happy Rose Day, My Love!
 
लाल गुलाब प्रेमासाठी, 
पिवळं गुलाब मैत्रीसाठी... 
पण माझ्यासाठी तूच सर्वकाही आहेस! 
रोझ डेच्या मनापासून शुभेच्छा
 
प्रियकरासाठी रोज डे च्या शुभेच्छा Rose Day Wishes for Boyfriend in Marathi
तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गुलाब आहेस, 
कांटे असले तरी तुझं प्रेम मला नेहमी सुगंध देतं
हॅप्पी रोज डे, माझ्या प्रिय! 
 
माझं हृदय तुझ्यासाठी गुलाबासारखं फुलतंय, 
तू माझ्या प्रेमाचा राजा आहेस
रोज डेच्या खूप खूप शुभेच्छा! 
 
तुझ्यासाठी एक लाल गुलाब, 
कारण तुझं प्रेम माझ्या आयुष्यातील सर्वात गोड आठवण आहे
हॅप्पी रोज डे, माझ्या प्रियकर! 
 
तुझ्या एका हसण्याने माझं जग गुलाबी होतं, 
तू माझ्यासाठी खास आहेस
रोज डे निमित्त तुझ्यावर प्रेम व्यक्त करतेय! 
 
तू माझ्या हृदयाचा गुलाब आहेस, 
ज्याचा सुगंध कधीच कमी होणार नाही
हॅप्पी रोज डे, love you forever!
 
माझं प्रेम तुझ्यासाठी गुलाबासारखं आहे
जितकं जपशील तितकं सुंदर फुलेल
हॅप्पी रोज डे! 
 
गुलाब देणं म्हणजे प्रेम व्यक्त करणं, 
आणि तुला गुलाब देऊन मी माझं सगळं प्रेम देतोय/देते. 
 
तुझ्यासाठी रोज डे, 
माझ्यासाठी रोज तुझं प्रेम! 
हॅप्पी रोज डे, darling!
 
प्रेयसीसाठी रोज डे शुभेच्छा Rose Day Wishes for Girlfriend in Marathi
तू गुलाबासारखी नाजूक आणि सुंदर आहेस, 
माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी दुसरी कोणतीच नाही
हॅप्पी रोज डे, माझी प्रिये! 
 
माझ्या गुलाबाचं फुल, 
काय सांगू तुला... 
तुझ्याशिवाय माझं जग अधुरं आहे
रोज डेच्या मनापासून शुभेच्छा! 
 
तुझ्या डोळ्यातील चमक मला गुलाबाचा सुगंध देते, 
तू माझी सगळ्यात आवडती आहेस
हॅप्पी रोज डे, माझी प्रिये! 
 
एक गुलाब तुझ्यासाठी, 
कारण तुझं प्रेम माझ्या हृदयात कायम फुलत राहतं
रोज डे खास तुझ्यासाठी! 
 
तू माझ्या स्वप्नातील गुलाब आहेस, 
ज्याचा रंग कधीच फिकट पडणार नाही
हॅप्पी रोज डे, माझ्या जिवलग!
 
मित्र-मैत्रिणींसाठी (For Friends)
मैत्रीचं नातं हे गुलाबासारखं असतं, 
जे काट्यातही हसायला शिकवतं
माझ्या लाडक्या मित्राला/मैत्रिणीला रोझ डेच्या शुभेच्छा!
 
आयुष्यात कितीही काटे आले तरी 
आपली मैत्री गुलाबासारखी टवटवीत राहो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Happy Rose Day!
 
खऱ्या मित्राची साथ ही गुलाबाच्या सुगंधासारखी असते, 
जी आयुष्यभर मनाला प्रसन्न ठेवते
थँक्स फॉर बीइंग देअर!
 
आजचा दिवस त्या लोकांसाठी 
ज्यांनी माझ्या आयुष्याची बाग आपल्या मैत्रीने फुलवली आहे
तुम्हा सर्वांना रोझ डेच्या शुभेच्छा
 
गुलाब तर कोमेजून जाईल, 
पण आपल्या मैत्रीचा सुगंध मात्र कायम दरवळत राहील
हॅप्पी रोझ डे!
 
नवर्‍यासाठी रोज डे च्या शुभेच्छा Rose Day Wishes for Husband in Marathi
माझे आयुष्य गुलाबासारखे सुंदर केल्याबद्दल धन्यवाद,
प्रिय पती, रोज डेच्या खूप खूप शुभेच्छा! 
 
गुलाबाच्या सुगंधाने बाग भरते तसे तुझे प्रेम माझे जीवन भरते
माझ्यावर इतके प्रेम केल्याबद्दल थँक्यू. 
हॅप्पी रोज डे, माझ्या प्रियकराला! 
 
तू माझ्या हृदयाचा राजा आहेस, 
आणि हे गुलाब तुझ्यासाठीच! 
नेहमी हसत राहा, ताजे राहा
रोज डेच्या शुभेच्छा! 
 
तुझ्या प्रेमाने माझं जग गुलाबी झालंय, 
तू माझ्यासाठी सर्वकाही आहेस
हॅप्पी रोज डे, माझ्या हसबंड! 
 
एक लाल गुलाब तुझ्यासाठी, 
कारण तुझं प्रेम माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट आहे
रोज डे खास तुझ्यासाठी!
 
बायकोसाठी रोज डे च्या शुभेच्छा Rose Day Wishes for Wife in Marathi
तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गुलाब आहेस, नाजूक आणि सुगंधी
हॅप्पी रोज डे, माझी प्रिय पत्नी!
 
प्रेमाच्या या गुलाबी दिवशी, 
तुला हार्दिक शुभेच्छा! 
तू माझ्या जीवनाचा सुगंध आहेस.
 
तू गुलाबासारखी नाजूक आहेस, 
तुझं प्रेम मला नेहमी ताजं ठेवतं
रोज डेच्या मनापासून शुभेच्छा, माझी प्रिये!
 
माझ्या गुलाबाच्या फुला, 
तुझ्यासाठी हे गुलाब आणि माझं सगळं प्रेम
तू माझ्या हृदयात कायम फुलत राहा
हॅप्पी रोज डे!
 
तुझ्या एका हसण्याने माझं घर बागेसारखं फुलतं, 
तू माझी सर्वात आवडती आहेस
रोज डे निमित्त तुझ्यावर प्रेम व्यक्त करतोय!
 
तुझं प्रेम गुलाबाचा सुगंध आहे, 
जे माझ्या हृदयात कायम राहील
हॅप्पी रोज डे, माझी लाडकी पत्नी!
 
खास आणि प्रेरणादायी (Special & Inspiring)
काट्यांच्या सोबतीतही जे हसते त्याला 'गुलाब' म्हणतात, 
आणि संकटातही जो साथ देतो त्याला 'आपला माणूस' म्हणतात
हॅप्पी रोझ डे!
 
ज्याप्रमाणे गुलाब स्वतः सुगंध पसरवतो, 
तसंच तू इतरांच्या आयुष्यात आनंद पसरवत राहा
तुला रोझ डेच्या शुभेच्छा!
 
प्रेम व्यक्त करायला शब्दांची गरज नसते, 
कधी कधी एक गुलाबही सर्वकाही सांगून जातो
तुला हा दिवस खूप सुखाचा जावो
 
प्रत्येक गुलाबाला काट्यांचे संरक्षण असते, 
तसेच तुझ्या आयुष्याला सुखाचे आणि यशाचे रक्षण लाभो
Happy Rose Day!
 
नाते असावे गुलाबासारखे, 
जे स्वतः काही न बोलता दुसऱ्याच्या आयुष्यात सुगंध भरते
तुम्हाला रोझ डेच्या खूप शुभेच्छा!
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

हाडांची कमजोरी आणि सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका, केल्शियमची कमतरतेची लक्षणे जाणून घ्या

Career in Bachelor of Technology B.Tech inTextile Technology Engineering: बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी बीटेक इन टेक्सटाइल टेक्नोलॉजी इंजिनियरिंग करून करिअर बनवा, पात्रता जॉब व्याप्ती जाणून घ्या

केस गळणे थांबवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे शॅम्पूऐवजी रीठाने केस धुवा

पोट आणि हृदय मजबूत ठेवायचे असेल, तर २४ तासांचा उपवास सुरू करा, फायदे जाणून घ्या

फक्त ३ पदार्थांत बनवा झणझणीत नारळ-टोमॅटो चटणी

पुढील लेख
Show comments