Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रेमाची अबोली !

Webdunia
आपल्या जीवनाच्या बागेत अलगद उमललेले फूल म्हणजे 'प्रेम'. प्रेमाची अडीच अक्षरे आपण गिरवू लागलो की, आपल्याला सगळं सगळं कळायला लागतं. आपल्या विचारात, वागण्यात, चालण्यात एवढेच नव्हेतर आपले डोळे ही विशिष्ट प्रकारची बोली बोलायला लागतात. आपल्या देहात जणू प्रेम... प्रेम... असे नाद गुंजू लागतात आणि मग होता रात्रीचा दिवस अन् दिवसाची रात्र. परंतु, असे प्रेम अभिव्यक्त करायला शब्द सुचत नाहीत. मग देहबोलीतूनच 'ती' किंवा 'तो' मनात फुलणारे प्रेम व्यक्त करतात.....

' प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं' असं कितीही म्हटलं तरी मनातलं 'गुपित' ओठावर आणण्याची किंवा ते व्यक्त करण्‍याची प्रत्येकाची विशिष्ट प्रकारची शैली असते. कोणी 'प्रेम' शब्दात व्यक्त करतं. तर कोणी नजरेचे तीर पाठवतं. 'प्रेम' व्यक्त करायला कधी कधी शब्द अपुरे पडतात आणि मनात पिंगा घालणारे प्रेम 'तिच्या' किंवा 'त्याच्या' देहबोलीतून प्रकट होते. संबंधित संदेशाचे 'ती' अर्थ लावते. यासाठी प्रेमाच्या गावाला जाण्यापूर्वी त्या प्रांतातल्या भाषेची जाण आवश्यक असते.

प्रेमाच्या गावाला जाणार्‍यालाच काय तर सोळाव्या वर्षात पदार्पण करणार्‍या प्रत्येकालाच थोडी थोडी ही भाषा शिकायला लागते. काही दिवस तर भावनाना शब्दरूप मिळतच नाही, डोळ्याच्या खाणाखुणांचे खेळ सुरू होतात. आपले डोळे फार चमत्कृती असतात. असंख्य प्रकारच्या भावना ते व्यक्त करू शकतात. आनंद- दु:ख, इच्छा-आकांक्षा, राग, भीती, पसंती-नापसंती दर्शवत असतात.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

Show comments