माहीममध्ये मनसेचे नितीन सरदेसाई व शिवसेनेचे सदा सरवणकर यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. एका राऊंडमध्ये सरदेसाई तर दुस-या राऊंडमध्ये सरवणकर आघाडी घेत आहेत. वांद्रे पश्चिम येथून भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर.
शिवसेनेचा भगवा फडकला, निफाडमध्ये शिवसेनेचे अनिल कदम विजयी. तर कोथरूडमध्ये भाजपाच्या मेधा कुलकर्णीही विजयी.
पुण्यातील पर्वती मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार माधुरी मिसाळ विजयी. ठाण्यातील ओवळा माजीवाडा येथून शिवसेनेचे प्रताप सरनाईक पिछाडीवर तर भाजपाचे संजय पांडे आघाडीवर
क-हाड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण अवघ्या ९२ मतांनी पिछाडीवर, राष्ट्रवादीतून भाजपात उडी मारलेले बबनराव पाचपुते श्रीगोंदा येथून पिछाडीवर. जितेंद्र आव्हाड आघाडीवर. महापालिकेत सत्ता असलेल्या नाशिकमध्ये मनसेचे चारही उमेदवार पिछाडीवर.
भाजपला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही, सत्तेसाठी तडजोड करणार नाही - नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस. भाजपच्या पूनम महाजन यांनीही राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगितले.
शिवसेना आमचा राजकीय विरोधक नाही, अद्याप शिवसेनेसोबत चर्चा झालेली नाही - देवेंद्र फडणवी, भाजप प्रदेशाध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्षाला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्याची शक्यता असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. नितिन गडकरी यांच्या माध्यमातून असे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. तसे झाले तर गडकरी हे मुख्यमंत्री होऊ शकतात.
पंधरा वर्ष आम्ही सत्तेत होतो, लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या, काँग्रेसच्या सद्यस्थितीसाठी कोणीही जबाबदार नसून एकमेकांवर आरोप करणे योग्य नाही - माणिकराव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
पुण्यातील आठ तर नागपूरमधील सहा जागांवर भाजप आघाडीवर.
भाजपसोबत अद्याप कोणतीही चर्चा नाही, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच अंतिम निर्णय घेतील - संजय राऊत, शिवसेना प्रवक्ते
घनगाव-सावंगीतून राजेश टोपे आघाडीवर.
मानखुर्दमधून अबू आझमी, विक्रोळीत मनसेचे मंगेश सांगळे आणि शिवडीतून बाळा नांदगावकर, वरळीतून सचिन अहिर पिछाडीवर. भोकरमध्ये अशोक चव्हाणांच्या पत्नी अमिता चव्हाण आघाडीवर.
ठाणे शहरात भाजपा उमेदवार संजय केळकर, कोपरी पाचपाखाडी येथून एकनाथ शिंदे आघाडीवर. तसेच कल्याण ग्रामीण येथून शिवसेनेचे सुभाष भोईर आघाडीवर.
ठाणे शहरात भाजपा उमेदवार संजय केळकर, कोपरी पाचपाखाडी येथून एकनाथ शिंदे आघाडीवर. तसेच कल्याण ग्रामीण येथून शिवसेनेचे सुभाष भोईर आघाडीवर.
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात तर ऐरोलीत विजय चौघुले आघाडीवर.
धारावीतून शिवसेनेचे बाबूराव माने आघाडीवर...
लोकसभेत जी मोदी लाट महाराष्ट्रात दिसून आली होती, ती विधानसभेतही कायम आहे हे यावरुन सिद्ध होत आहे, प्रकाश बाळ जोशी, राजकीय विश्लेषक
इंदापूरमधून काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील पिछाडीवर
इस्लामपूरमधून राष्ट्रवादीचे जयंत पाटील आघाडीवर
सद्यस्थिती कायम राहिली तर महाराष्ट्रात भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असे म्हणता येऊ शकते, राजकीय विश्लेषक प्रकाश बाळ जोशी
कुडाळमधून कॉंग्रेसचे नेते नारायण राणे तिसर्या फेरीत आघाडी वर
अमरावतीत भाजपचे डॉ.सुनील देशमुख आघाडीवर...
नंदुरबारमधून भाजपचे विजयकुमार गावीत आघाडीवर
मतमोजणी सुरू... दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
सध्या हाती आलेल्या निकालांवरुन विधानसभेचे पारडे भाजपच्या बाजूने झुकलेले दिसून येत आहेत.
जळगाव शहरातून शिवसेनेचे सुरेश जैन आघाडीवर...
जुन्नरमधून मनसेचे शरद सोनवणे आघाडीवर...
कराड (दक्षिण)मधून पृथ्वीराज चव्हाण यांची पिछाडी तर विकासकाका उंडाळकरांचे आघाडीवर...
मुक्ताईनगरमधून भाजपचे नेते एकनाथ खडसे आघाडीवर....
सोलापूर(मध्य)मधून प्रणिती शिंदे आघाडीवर
बीड लोकसभा पोटनिवडणूक- भाजपच्या प्रीतम मुंडे-खाडे आघाडीवर...
औरंगाबादमधून एमआएमचे इम्तीहाज जलील आघाडीवर...
पुण्यात भाजपचे गिरीश बापट आघाडीवर
शिर्डी मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील पहिल्या फेरीत आघाडीवर
येवल्यात छगन भुजबळ आघाडीवर
बारामती मतदारसंघात अजित पवार आघाडीवर
मुंबईत बहुतांश मतदारसंघात शिवसेना आघाडीवर
तासगावमधून आरआर पाटील पिछाडीवर
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कराड दक्षिण मतदारसंघातून आघाडीवर
नाशिक पूर्व मधून शिवसेनेचे चंद्रकांत पांडुरंग लावटे आघाडीवर...
घाटकोपर मतदारसंघातून भाजपचे राम कदम आघाडीवर
पुणे कॅन्टोमेन्टमधून रमेश बागवे पिछाडीवर
परळीतून भाजपच्या पंकजा मुंडे आघाडीवर
माणिकराव ठाकरे यांचे सुपुत्र राहुल ठाकरे यवतमाळमध्ये पिछाडीवर
राष्ट्रवादीचे प्रवक्ता नवाब मलिक म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच कॉंग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता
बीडमधून विनायक मेटेंची आघाडी..
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील पिछाडीवर
कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या मतदारसंघात शिवसेनेची आघाडी...
देवेंद्र फडणवीस नागपूर पश्चिममधून आघाडीवर
ओकोला पश्चिममधून कॉंग्रेसचे गोवर्धन शर्मा आघाडीवर
अमरावतीत रावसाहेब शेखावत पिछाडीवर...
कुडाळमधून शिवसेनेचे वैभव नाईक आघाडीवर, नारायण राणे पिछाडीवर
शिवसेना 4 , कॉंग्रेस 1, आणि राष्ट्रवादी 1 जागेवर पुढे
नांदगावमधून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ आघाडीवर
उत्तर महाराष्ट्रात दोन जागांवर भाजप आघाडीवर
विदर्भात सहा जागांवर भाजप आघाडीवर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला राज्यभरात सुरूवात