Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज-उध्दवसाठी भैयूमहाराज सक्रिय

Webdunia
शुक्रवार, 19 सप्टेंबर 2014 (12:04 IST)
विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरून शिवसेना आणि भाजप यांचतील संबंध कमालीचे ताणले गेले असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोन चुलतभैयूमध्ये दिलजमाई घडवून आणण्याच्या छुप्या हालचाली सुरू झाल आहेत आणि त्यांचा सूत्रधार आहे. बडय़ा नेत्यांचा राजकीय युवा गुरू विशेष म्हणजे सत्ताधारी आघाडीतील एका नेत्याच्या घरातून या हालचालीची ‘तट’बंदी करण्यात येत आहे. मात्र त्याला अद्याप तरी दोन्ही बाजूंकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नसल्याचे समजते.
 
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपमधील वाद टोकाला गेला आहे. त्यांच्या पंचवीस- तीस वर्षाचा संसार तुटतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काडीमोड झालाच तर पुढे कोणकोणते पर्याय असू शकतात, याची दोन्ही पक्षांकडून चाचपणी केली जात आहे. भाजपने मनसेशी हातमिळवणीची आशा सोडलेली नाही. दुसरीकडे शिवसेना-मनसेने एकत्र यावे, या चर्चेलाही अजून पूर्णविराम मिळालेला नाही. एकंदर शिवसेना आणि भाजपसाठी मनसे हा पर्याय अजूनही खुला आहे, असे मानले जाते.
 
या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षामधील काही बडय़ा नेत्याचे राजकीं गुरू म्हणून ओळखल्या जाणार्‍या एका युवाबाबाने उध्दव व राज यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती मिळते. 
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

नाशिकात होणाऱ्या भावी सुनेशी वडिलांनी केले लग्न, रागात मुलगा झाला संन्यासी

पालघरमध्ये दोघांनी बंदुकीच्या धाकावर 45 लाखांचे सोन्याचे दागिने लुटले

म्यानमारच्या लष्कराने आपल्याच देशातील एका गावावर केला हवाई हल्ला, 40 जणांचा मृत्यू

विजय हजारे प्री-क्वार्टरफायनलमध्ये मोहम्मद शमीने ३ विकेट्स घेतले

IND W vs IRE W: पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने आयर्लंडवर सहा गडी राखून विजय मिळवला

Show comments