suvichar

Veer Savarkar Punyatithi 2026 Messages in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

Webdunia
गुरूवार, 26 फेब्रुवारी 2026 (06:34 IST)
प्रखर राष्ट्रभक्तीचा मंत्र देणाऱ्या, 
अथांग सागरालाही आपल्या साहसाने थक्क करणाऱ्या 
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 
 
"ने मजसी ने परत मातृभूमीला, सागर प्राण तळमळला..."
अशी आर्त साद घालणाऱ्या थोर क्रांतीसूर्याला पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!
 
ज्यांच्या विचारात क्रांतीची आग होती आणि काळजात देशाचे प्रेम... 
अशा महान विनायक दामोदर सावरकरांना स्मृतिदिनी मानाचा मुजरा!
 
अंदमानच्या काळकोठडीतही ज्यांची लेखणी थांबली नाही, 
ज्यांनी भिंतीवर महाकाव्य कोरले... 
त्या प्रज्ञावंत महापुरुषाला विनम्र अभिवादन!
 
सावरकर म्हणजे केवळ एक नाव नाही, तर तो एक विचार आहे, एक ऊर्जा आहे! 
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस वंदन
 
"अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला..."
मृत्यूलाही ज्यांनी आपल्या धैर्याने हरवले, 
त्या स्वातंत्र्यवीरांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!
 
हिंदुहृदयसम्राट, थोर समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
 
ज्यांनी परदेशी कापडाची होळी पेटवून स्वातंत्र्याचा एल्गार पुकारला, 
अशा धगधगत्या ज्वालामुखील महामानवास मानाचा मुजरा!
 
'मातृभूमीच्या चरणी मरण ते जनन' मानणाऱ्या थोर क्रांतीकारकास पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
 
विज्ञानाचा पुरस्कार करणारे, अस्पृश्यता निवारण्याचे कार्य करणारे द्रष्टे महापुरुष सावरकर यांच्या स्मृतीस विनम्र वंदन!
 
शस्त्र आणि शास्त्र यांचा संगम ज्यांच्या विचारात होता, 
त्या विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना त्रिवार अभिवादन!
 
देहाकडून देवाकडे जाताना ज्यांना 'देश' लागला, 
अशा महान आत्मार्पण करणाऱ्या वीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम!

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments