Marathi Biodata Maker

भिंत पुन्हा चालली...

- मनमोहन नातू

Webdunia
WD
अंदमानात असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांना काव्य स्फुरू लागले. जवळ कागद नव्हते. त्यांनी उष:कालच्या आभाळाला विचारले, 'माझा कागद होतोस काय?' आभाळ उत्तरले -

मी मुक्तामधले मुक्त - तू कैद्यांमधला कैदी।
माझे नि तुझे व्हायाचे - ते सूर कसे संवादी?

माझ्यावर लिहिती गीते - या मंद-समीरण लहरी।
माझ्यावर चित्रित होते - गरूडाची गर्द भरारी। ।

जड लंगर तुझिया पायी - तू पीस कसा होणार?
माझ्याहून आहे योग्य - भूमीला प्रश्न विचार।।

आभाळ म्हणाले 'नाही' - भूमिही म्हणाली 'नाही'।
मग विनायकाने त्यांची - आळवणी केली नाही। ।

पापण्यांत जळली लंका - लाह्यांपरि आसू झाले।
उच्चारून होण्याआधी - उच्चाटन शब्दां आले।

की जन्म घ्यायच्या वेळी - गंगेस हिमालय नाही।
शाई न स्पर्शली असूनी - हे अभंग नदिच्या 'बाही'।।
( ती पहाट लालम् लाल - अनपेक्षित झाली काळी)

दगडाची पार्थिव भिंत - तो पुढे अकल्पित सरली।
' मी कागद झाले आहे - चल ‍‍‍‍‍‍लिही' असे ती वदली।
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

पुण्यात जनगणनेच्या कामावर जात असलेल्या महिला शिक्षिकेला डंपरने चिरडले; शिक्षक संघटनांनी आंदोलन सुरू केले

वर्धा एसटी वर्कशॉपमध्ये भीषण आग; ई-शिवा बस थोडक्यात बचावल्या

कोपरगावमध्ये अवैध कत्तलखान्यांवर बुलडोझर कारवाई; पोलीस आणि पालिका प्रशासनाची संयुक्तपणे कारवाई

LIVE: बकरीदपूर्वी कोपरगावमध्ये अवैध कत्तलखान्यांवर बुलडोझर कारवाई

SRH vs RR : आज एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमने-सामने येणार

Show comments