Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Vitthal Abhang कशाला काशी जातो रे बाबा !

Webdunia
कशाला काशी जातो रे बाबा !
कशाला पंढरी जातो ! ।।धृ0।।
 
संत सांगती ते ऐकत नाही,
इंद्रियाचे ऐकतो ।
कीर्तनी मान डोलवितो परी,
कोंबडी,बकरी खातो !।१।
 
वडील जनाचे श्राध्द कराया,
गंगे मध्ये पिंड देतो ।
खोटा व्यापार जरा ना सोडी,
देव कसा पावतो ।।२।।
 
खांदी पताका,तुळसी गुळ्यामधे,
घडी-घडी टाळ वाजवतो ।
गरीब-जनांची दया ना चित्ती,
दानासी हात आवरतो ! ।।३।।
 
झालेले मागे पाप धुवाया,
गंगेत धावुनी न्हातो ।
तुकड्या म्हणे,सत्य-आचरण वाचोनी,
कोणीच ना मुक्त होतो ।।४।।

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

।। श्री दत्तगुरूंची आरती ।।

श्रीदत्त क्षेत्र औदुंबर Shri Datta Kshetra Audumbar

दत्त जयंती विशेष रेसिपी : दत्तगुरूंना आवडणारी घेवड्याची भाजी

दत्तमाला कर्णांकित माघ माहात्म्य

श्रीदत्तात्रेयाष्टोत्तरशतनामावली श्री दत्तात्रेय 108 नाम

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments