नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी || धृ || ऐसा लाभ बांधा गांठी विठ्ठल पायी मिठी || १ || नामापरते साधन नाही जें तू करिसी आणिक कांही || २ || हाकरोनी सांगे तुका नाम घेता राहो नका || ३ ||...