Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चंद्रावर 'बॉम्बस्फोट' !

वेबदुनिया
ND
ND
' नासा' या अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्थेने चंद्रावर पाणी शोधण्याच्या दृष्टिने एक महत्त्वाचा प्रयोग करताना चक्क चंद्राच्या पृष्ठभागावर बॉम्बस्फोट घडवून आणला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्वालामुखीच्या मुखात हा स्फोट घडवून आणला. यातून पृष्ठभागात रूतून बसलेल्या बर्फाळ पाण्याचा शोध लागेल असा अंदाज आहे.

आज अमेरिकेतील ११ वाजून ३१ मिनिटांनी २.३ टनी रॉकेट चंद्राच्या ज्वालामुखीमय पृष्ठभागावर जाऊन आदळले. त्यामागून गेलेल्या अन्य एका यानाने या स्फोटानंतर उडालेल्या धुराळ्यातून जात आवश्यक ती माहिती गोळा केली. नासाने हा अवकाशातील महत्त्वपूर्ण 'सोहळा' इंटरनेटवरून लाईव्ह दाखवला. चंद्रावर घडणार्‍या या घडामोडीची माहिती घेण्यासाठी जगभरातील अभ्यासूंच्या दुर्बिणी आज चंद्राच्या दिशेने रोखल्या गेल्या होत्या.

चंद्रावर पाणी असल्याचा शोध भारताने पाठवलेल्या चांद्रयानाद्वारे गोळा केलेल्या माहितीतून लागला आहे. हे पाणीही अपेक्षेपेक्षा बरेच असल्याचेही समजले आहे. त्यामुळे आता या पाण्याविषयी अधिक माहिती मिळविण्याचे शास्त्रज्ञांचे प्रयत्न आहेत. त्याअंतर्गतच हा स्फोट घडविण्यात आला.

चंद्रावरील ज्वालामुखीच्या मुखात हे पाणी बर्फाळ स्वरूपात असावे असा अंदाज आहे. या पाण्यापर्यंत आजपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचू शकलेला नाही. त्यामुळे या पाण्याचे अतिशय कठीम अशा बर्फात रूपांतर झाल्याची शक्यता आहे. हा स्फोट हे पाणी बाहेर काढेल अशी शास्त्रज्ञांना अपेक्षा आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments