Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

योग करण्यापूर्वी माहीत असावे हे 7 नियम नाही तर होऊ शकतं नुकसान

yoga
Webdunia
शरीराची तयारी
व्यायामापूर्वी ज्या प्रकारे वार्मअप करणे आवश्यक असतं त्याच प्रकारे योगामध्ये देखील वार्मअप आवश्यक आहे. याने शरीरात लचक येईल. आपण हलका व्यायाम किंवा सूक्ष्म आसन देखील करू शकता.
 
भरलेल्या पोटाने योग नाही
सकाळ असो वा संध्याकाळ जेवण झाल्यावर योग करणे योग्य नाही. संध्याकाळी योग करत असाल तर आहार आणि योगात तीन तासाचा अंतर ठेवणे गरजेचे आहे.
 
गार पाणी पिणे टाळा
योग करताना गार पाणी पिणे टाळावे हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. योग दरम्यान शरीर उष्ण होत अशात गार पाणी पिण्याने सर्दी, कफ आणि ऍलर्जी सारखे आजार होण्याची शक्यता वाढते. म्हणून योग केल्यानंतर सामान्य पाणी पिणे योग्य ठरेल.
 
आजारात योग योग्य नाही
आपण गंभीर आजारात असाल, किंवा वेदना, ताप असल्यास योग करणे टाळावे.
 
मूत्र विसर्जन टाळा
योग दरम्यान मूत्र विसर्जन टाळावे कारण यात शरीराचं पाणी घामाद्वारे बाहेर पडणे अधिक गरजेचं आहे.
 
लगेच अंघोळ घोळ नको
योगासनानंतर लगेच अंघोळ करणे टाळावे. कारण व्यायामानंतर शरीर उष्ण झाल्यामुळे लगेच अंघोळीने विपरित परिणाम होऊ शकतात. योग केल्याच्या एका तासाने अंघोळ करणे योग्य ठरेल.
 
थट्टा नको
योगासन करताना मोबाइल ऑफ करावा तसेच लक्ष केवळ योगावर असावे कारण चुकीची स्टेप धोकादायक ठरू शकते. तसेच या दरम्यान मजा-मस्ती करणे टाळावे कारण योग एक साधना आहे, जी एक्सपर्टच्या सल्ल्याने व्यवस्थित रूपाने केल्यास फायदा होतो.
 
विशेष: योगासन करताना आरामदायक वस्त्र परिधान करावे तसेच ज्वेलरी काढून ठेवावी. योग खुल्या वातावरणात केल्यास अधिक फायदा मिळतो. तसेच कोणतीही मुद्रा करताना त्यातून घाईने बाहेर निघण्याचा प्रयत्न करणे टाळावे. याचे विपरित परिणाम येऊ शकतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

Good Friday Special Recipe फिश करी

कांद्यावर काळे डाग असणे म्हणजे काय? याचा कधी विचार केला आहे का? जाणून घ्या

उन्हाळा विशेष थंडगार Pineapple juice

World Earth Day Essay 2025 in Marathi जागतिक वसुंधरा दिन निबंध मराठीत

नाश्त्यात बनवा ब्रेड उपमा रेसिपी

पुढील लेख
Show comments